एकता कपूरने म्हटलं होतं पर्लला निर्दोष
एकताने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं, ‘मुलीच्या आईसोबत बोलल्यानंतर त्यांनी स्वतः ही गोष्ट मान्य केली की पर्लचा या गोष्टीची कोणताही संबंध नाही. त्यांच्या पतीने पर्लविरोधात खोटी तक्रार केली आहे. जेणेकरून ते आपल्या मुलीचा ताबा मिळवू शकतील. त्यांना न्यायालयाला हे दाखवून द्यायचं आहे की एक कामावर जाणारी आई आपल्या मुलीचं संगोपन करू शकत नाही.’
डीसीपी यांनी दिलं एकताला उत्तर
जेव्हा एकताच्या पोस्टबद्दल पोलिसांना विचारणा करण्यात आली तेव्हा डीसीपी संजय कुमार पाटील यांनी म्हटलं, ‘नाही, त्याच्यावर लावले गेलेले आरोप खोटे नाहीत. तपासात त्याचं नाव आलं आहे. त्याच्याविरोधात पुरावा आहे. त्यामुळेच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ट्रायलमध्ये सत्य सगळ्यांसमोर येईल.’
वडिलांनी दाखल केली होती तक्रार
मीडियासोबत बोलताना डीसीपी यांनी स्पष्ट केलं की, ही तक्रार मुलीच्या वडिलांनी २०१९ साली दाखल केली आहे. पीडिता पाच वर्षांची असताना पर्लने तिचं शोषण केलं आहे, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. वर्सोवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली तक्रार नंतर वाळिव पोलिसांकडे सोपवण्यात आली. अभिनेत्याविरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या आई- वडिलांमध्ये सुरू आहे न्यायालयीन लढाई
पीडित मुलीच्या आई- वडिलांमध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केलेला आहे. तर दोघेही आपल्या मुलीचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात लढत आहेत. पीडितेची आई पर्लसोबत एकाच कार्यक्रमात काम करत असल्याने ती सेटवर तिच्या मुलीलाही घेऊन जात असे. मुलीचा ताबा मिळवण्यासाठी पीडितेच्या वडिलांनी पर्लवर आरोप केल्याचं पीडितेच्या आईचं म्हणणं आहे.
आई- वडिलांना जन्मापूर्वीच झाली होती नकोशी नेहा कक्कर; भावाने सांगितलं
नवरा- बायकोच्या भांडणात पर्लवर केले गेलेत आरोप- एकता कपूर
डीसीपी संजय कुमार पाटील यांनी दिलं एकताला उत्तर
अभिनेत्याविरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल