Home गुन्हा एकाच रात्री आठ दुकाने फोडली, 18 लाख रुपये लंपास

एकाच रात्री आठ दुकाने फोडली, 18 लाख रुपये लंपास

0

दारव्हा (यवतमाळ) : शहरात चोरट्यांनी आठ दुकाने फोडून रोख १८ हजार रुपये लंपास केले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. एकाच रात्री घडलेल्या या घटनेने शहरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तहसील चौकातील व्यापारी लाईनमधील प्रनिल वाँच सेंटर, प्रमोद प्रिंटर्स, बालाजी बिछायत केंद्र, पवन ग्लास सेंटर, श्री टेलर या दुकानांच्या शटरचे कुलुप तोडून चोरटे आत घुसले परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही. काही दुकानातील कीरकोळ रक्कम चोरीला गेली. तर बालाजी ज्वेलर्स व प्रभु सायकल स्टोअर चे कुलुप तोडण्यात आले. परंतु सेंट्रल लाँक तोडण्यात चोरटे अयशस्वी ठरले. या घटनेत प्रमोद प्रिंटर्स मधील रोख १८ हजार रुपये लंपास केल्याची तक्रार देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप बाजड, सुनील राठोड व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा केला पुढील तपास सुरू आहे.