Home ताज्या बातम्या एका तरुणाने थेट सिंहापुढे उडी घेतल्याने खळबळ उडाली; प्राणिसंग्रहालयातील एक भयानक व्हिडीओ व्हायरल

एका तरुणाने थेट सिंहापुढे उडी घेतल्याने खळबळ उडाली; प्राणिसंग्रहालयातील एक भयानक व्हिडीओ व्हायरल

0

एका तरुणाने थेट सिंहापुढे उडी घेतल्याने खळबळ उडाली; प्राणिसंग्रहालयातील एक भयानक व्हिडीओ व्हायरल

दिल्लीतील प्राणिसंग्रहालयातील एक भयानक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. येथे एका तरुणाने थेट सिंहापुढे उडी घेतल्याने खळबळ उडाली. तरुणाने सिंहापुढे उडी घेतल्याने प्राणिसंग्रहालयातील सुरक्षारक्षक आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. याच दरम्यान प्राणिसंग्रहालयात आलेल्या लोकांनी मोबाईलमध्ये हा क्षण कैद केला. याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाने जाणूनबुजून सिंहाच्या पुढ्यात उडी घेतली होती. यावेळी उपस्थिती लोकांनी त्याची समजूत काढण्याची, त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना न जुमानता त्याने सिंहासमोर उडी घेतली. यानंतर तो सिंहाच्या जवळच जावून बसला. जवळपास एक मिनिट तो सिंहाच्या जवळ बसून राहिला होता. यादरम्यान सिंहाने त्याला काहीही नुकसान पोहोचवले नाही.

सध्या या तरुणाने सिंहाच्या समोर उचलून पोलीस ठाण्यात आणले असून त्याची चौकशी सुरू आहे. रेहान खान असे या 28 वर्षीय तरुणाचे नाव आहे. प्राथमिक तपासामध्ये हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे. सध्या पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत.