Home मनोरंजन एका मिनिटात तुम्ही किती पुशअप्स मारू शकता? मिलिंद सोमणचा हा व्हिडीओ पाहाच!

एका मिनिटात तुम्ही किती पुशअप्स मारू शकता? मिलिंद सोमणचा हा व्हिडीओ पाहाच!

0
एका मिनिटात तुम्ही किती पुशअप्स मारू शकता? मिलिंद सोमणचा हा व्हिडीओ पाहाच!

[ad_1]

हायलाइट्स:

  • अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण आहे फिटनेस क्रिक
  • सोशल मीडियावरून चाहत्यांना देतो फिटनेसेच धडे
  • पुन्हा एकदा चर्चा मिलिंदच्या फिटनेसची

मुंबई : अभिनेता आणि मॉडेल असलेला मिलिंद सोमण अनेकदा त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. फिटनेसबरोबर मिलिंद सोशल मीडियावर देखील खूपच सक्रीय आहे. सोशल मीडियाद्वारे तो आपल्या चाहत्यांना फिटनेसेचे धडे देत असतो. त्यामुळेच त्याचे चाहते देखील त्याच्या नवीन पोस्टची आतुरतेने वाट बघत असतात. अलिकडेच मिलिंदने एक व्हिडीओ शेअर केला असून त्याची बरीच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो आणि एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. पहिल्या फोटोमध्ये मिलिंद शर्टलेस आहे. त्यामध्ये त्याचे बाइसेप्स आणि अॅब्स दिसत आहेत. त्यानंतर त्याने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्यामध्ये तो पुशअप्स काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करताना मिलिंदने त्याचे मतही व्यक्त केले आहे. मिलिंदने लिहिले आहे, ‘ काही प्रथामिक गोष्टी कधीच विसरू नका. जेव्हा मी म्हणतो की माझ्याकडे व्यायाम करायला वेळच नाही. तेव्हा मी एखादं मिनिट तर स्वतःसाठी नक्कीच काढतो. जास्तीत ६० सेकंदाही माझ्यासाठी खूप असतात. वेळ, जागा, उपकरण नाही असे कोणतेही
कारण लागत नाही. आपल्या शरीराचे वजन हातांवर पेलणे हे पुरेसे असते. फक्त एका मिनिटामध्ये तुम्ही किती पुशअप्स काढू शकता हे बघा. पुशअप्सची ही संख्या वाढवायचा प्रयत्न करा. सुरुवात करायला व्यायामाचा हा प्रकार अतिशय उत्तम आहे. मिलिंदप्रमाणे त्याच्या बायकोला आणि आईला देखील फिटनेसची आवड आहे.

दरम्यान, मिलिंद बॉलिवूडमधील एक संवेदनशील कलाकारही आहे. सिनेमाशिवाय तो आपल्या फिटनेससाठी ओळखला जातो. त्यामुळे मिलिंद आज ५५ वर्षांचा असून ही कमालीचा फिट आहे. त्याचा हा फिटनेस २५ वर्षांच्या युवकाला मात देणार आहे. त्याला पाहून अनेकांना फिट राहण्याची प्रेरणा मिळते.

आपल्या चाहत्यांनीही आपल्यासारखे फिट असावे, अशी मिलिंदचीही इच्छा असते. त्यामुळेच जेव्हा जेव्हा त्याचे चाहते मिलिंदकडे त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त करतात तेव्हा मिलिंद त्यांना दहा अथवा वीस पुशअप्स काढा मगच सेल्फी मिळेल असे सांगतो. त्याचे चाहते मिलिंदबरोबर सेल्फी काढायला मिळावे म्हणून पुशअप्स काढतात देखील.



[ad_2]

Source link