हायलाइट्स:
- शरदच्या समस्येमुळे दिग्दर्शकांकडून मिळाला होता अनेकदा नकार
- दोन वर्षात शरदने केली समस्येवर मात
- ‘तानाजी’ आणि ‘लक्ष्मी’ चित्रपटात झळकलाय शरद
मुख्यमंत्र्यांना ही कळकळीची विनंती… निवेदिता सराफ यांनी शेअर केला व्हिडिओ
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरदने त्याच्या बोबडं बोलण्याबद्दल सांगताना म्हटलं, ‘मला बालपणापासूनच बोबडं बोलण्याची समस्या होती. त्यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला. माझ्या बोबडं बोलण्यामुळे लोक मला चिडवत. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला वाईट वागणूक दिली गेली. परंतु, आता माझ्याकडे पाहा. मी आता माझ्या क्षेत्रात त्या स्थानावर आहे जिथे माझ्या मुलाखती घेतल्या जातात. मला माझ्या बोलण्याची भीती वाटायची त्यामुळे मला खूप नकारांना सामोरं जावं लागायचं. अभिनय तर माझ्यासाठी फार दूरची गोष्ट होती.’
चित्रपटसृष्टीत मिळालेल्या नकाराबद्दल बोलताना शरद म्हणाला, ‘मी बराच बोबडा बोलायचो त्यामुळे मला नाकारलं जायचं. मला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला जायचा. पण त्यामुळे मला आणखी बळ मिळालं. मी मेहनत केली आणि पुढील दोन वर्षात या बोबडं बोलण्याच्या समस्येपासून मुक्त झालो. नकार मिळला पण मी त्यातून शिकलो.’ शरदने ‘बाहुबली’ चित्रपटातील मुख्य पात्राला दिलेल्या आवाजाचं प्रचंड कौतुक झालं होतं. त्यासोबतच तो ‘तानाजी’ आणि ‘लक्ष्मी’ सारख्या चित्रपटात झळकला होता. आता शरदचे चाहते ‘फॅमिली मॅन ३’ ची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
प्रकृती बिघडल्याने अभिनेत्री रुपल पटेलांना केलं इस्पितळात भरती