हायलाइट्स:
- अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा आज वाढदिवस
- चित्रपटांपेक्षा आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या डिंपल कपाडिया
- बी-टाऊनमध्ये झाली होती डिंपल आणि अभिनेता सनी देओल यांच्या नात्याची चर्चा
युवराज सिंगला डेट करत होती दीपिका पादुकोण, स्वभावाने केला घात
डिंपल कपाडिया यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. एकीकडे बॉबीमधील त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं तर दुसरीकडे त्यांनी ‘सागर’ चित्रपटातील त्यांनी साकारलेली रुदालीची भूमिकाही गाजली होती. डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नानंतर अवघ्या ९ वर्षांतच हे दोघं वेगळे झाले. दरम्यान एका मुलाखतीत, ‘माझ्या आयुष्यातला आनंद तेव्हाच संपला जेव्हा मी राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं.’ असं विधान डिंपल कपाडिया यांनी केलं होतं.
एका हाऊस वाइफचं आयुष्य जगल्यानंतर राजेश खन्ना यांच्यापासून वेगळं झाल्यावर डिंपल यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत ‘सागर’ चित्रपटात काम केलं. त्यांचा चित्रपट सुपरहिट झाला आणि डिंपल यांना चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्याच काळात बी- टाऊनमध्ये डिंपल आणि सनी देओल यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं.
Video- कतरिनाला भेटायला गुपचूप तिच्या घरी पोहोचला विकी कौशल
सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांची लव्हस्टोरी ९० च्या दशकात बरीच चर्चेत राहिली. आपलं पहिलं प्रेम अमृता सिंगपासून वेगळं झाल्यानंतर सनी देओलला आधाराची गरज होती. तर दुसरीकडे डिंपलही राजेश खन्नापासून वेगळ्या झाल्या होत्या. दोघंही एकटे होते अशात त्यांच्यातील जवळीक वाढली. एवढंच नाही तर जेव्हा डिंपल आणि सनी एकमेकांना डेट करत होते त्यावेळी डिंपल यांच्या मुली ट्विंकल आणि रिंकी सनी देओलला ‘छोटे पापा’ म्हणून हाक मारत असत.

सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांनी १९८४ साली रिलीज झालेल्या ‘मंजिल- मंजिल’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी सनी देओल विवाहित होता आणि त्याची पत्नी पूजा लंडनमध्ये राहत होती. अर्थात डिंपल आणि सनी यांनी आपलं नातं कधीच उघडपणे मान्य केलं नाही. पण त्यांच्या नात्याच्या चर्चा मात्र खूप झाल्या. पण हे नातं फार काळ टिकलं नाही असंही म्हटलं जातं.

कालांतरानं या दोघांच्या अफेअरच्या चर्चा होणं बंद झालं. पण २०१७ मध्ये सनी देओल जेव्हा लंडनमध्ये व्हेकेशनसाठी गेला होता. त्यावेळी काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. ज्यात सनी देओल आणि डिंपल एकमेकांच्या हातात हात घालून एका बसस्टॉपवर बसलेले दिसत होते. त्यानंतर त्यांच्या नात्यावर बरेच प्रश्न उपस्थित केले गेले होते. पण या दोघांनीही यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.