एकेकाळी ‘डॉमिनोज पिझ्झा’मध्ये काम करायचा करण मेहरा, व्हिडीओ होतोय व्हायरल

एकेकाळी ‘डॉमिनोज पिझ्झा’मध्ये काम करायचा करण मेहरा, व्हिडीओ होतोय व्हायरल
- Advertisement -


हायलाइट्स:

  • मागच्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे करण मेहरा
  • एकेकाळी डॉमिनोज पिझ्झामध्ये काम करत असे करण मेहरा
  • सोशल मीडियावर व्हायरल होतोय करण मेहराचा व्हिडीओ

मुंबई: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहरा मागच्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. करण सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. २००९ साली ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून करणनं अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं. पण त्याआधी तो डॉमिनोज पिझ्झामध्ये काम करत असे. नुकताच करणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यातून ही गोष्ट समोर आली आहे.

हो …म्हणून मीच घरातले कॅमेरे बंद केले होते; करणच्या आरोपांवर निशाचा धक्कादायक खुलासा
करण मेहरा आज टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध नाव असलं तरी एक वेळ अशी होती की, तो डॉमिनोज पिझ्झासाठी काम करत होता. करणनं त्यावेळी १२ वीची परीक्षा दिली होती. करणला फॅशन डिझायनर व्हायचं होतं. ज्यासाठी त्यानं दिल्ली नॅशनल इन्स्टिट्यीट ऑफ फॅशन टेक्नॉलजीमधून फॅशन डिझाइनचा कोर्स पूर्ण केला.

करणनं १२ वीच्या परीक्षा संपल्यानंतर काही काळ डॉमिनोज पिझ्झामध्ये समर ट्रेनी म्हणून काम केलं होतं. याचा खुलासा स्वतः करणनंच एका व्हिडीओमध्ये केला आहे. त्याचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. करणनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो पिझ्झा तयार करताना दिसत आहे. या व्हिडीच्या पोस्टमध्ये त्यानं १२ वीची परीक्षा दिल्यानंतर आपण कशाप्रकारे डॉमिनोजमध्ये काम केलं हे सांगितलं आहे.


२००९ साली करणनं ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केलं. या मालिकेत त्यानं साकारलेली नैतिकची भूमिका बरीच गाजली. त्यानंतर तो ‘नच बलिए ५’, ‘साथ निभाना साथिया’, ‘बिग बॉस १०’, ‘खटमल-ए-इश्क’, ‘एक भ्रम सर्वगुण संपन्न’ आणि ‘शुभारंभ’ या कार्यक्रमात दिसला.

निशा रावलने केलं मान्य, ‘हो मला बायपोलर डिसऑर्डर आजार होता, पण मी वेडी नाहीए’
दरम्यान मागच्या काही दिवसांपासून करणचं वैवाहिक आणि खासगी आयुष्य सोशल मीडियावर चर्चेत आहे. करणची पत्नी निशा रावल हिने त्याच्या कौटुंबीक हिंसाचार आणि मारहाणीचा आरोप केला होता. ज्यामुळे त्याला अटकही झाली होती. पण त्यानंतर जामिनावर त्याला सोडण्यात आलं.





Source link

- Advertisement -