पुणे : परवेज शेख
सोन्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन जणांना पुणे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल एक कोटी पाच लाख रुपयांचे 2 किलो 974 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
चेन्नई एक्सप्रेस गाडीने दोन संशयित इसम अवैध सोन्याची वाहतूक करीत आहेत अशी बातमी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना खबऱ्याकडून मिळाली. या बातमीची खात्री करण्यासाठी शनिवारी, ३ ऑगस्ट रोजी रेल्वे पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकामध्ये तपास केला असता दोन संशयित इसम आढळून आले.
त्यांच्या संशयित हालचाली पाहताच पोलिसांनी त्यांच्या सामानाची झडती घेतली असता त्यांच्याकडे 2 किलो 974 ग्रॅम सोने आढळून आले.त्याची अंदाजे किंमत एक कोटी पाच लाख रुपये आहे. या सोन्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. तसेच त्यांच्याकडे कोणतेही कायदेशीर बिल नसल्याने सदरचे सोने जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे आयकर विभागाला पुढील कारवाईसाठी कळविण्यात आले. पुढील तपास सुरु आहे.






















WhatsApp