Home गुन्हा एक पिस्तूल दोन जिवंत काडतुस बाळगणारा अटकेत

एक पिस्तूल दोन जिवंत काडतुस बाळगणारा अटकेत

0

एक पिस्तूल दोन जिवंत काडतुस बाळगणारा अटकेत

पुणे : परवेज शेख स्थानिक गुन्हे शाखेकडून एक अवैद्य गावठी पिस्टल २ जिवंत बुलेट हस्तगत” मा.पोलीस अधीक्षक श्री. संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण जिल्हयातील आगामी विधानसभा निवडणुक सन २०१९ ही शांततेत पार पाडण्याकरीता बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे यांच्याविरुद्ध मोहीम राबवली

मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप पाटील साो. यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यारीता स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक श्री. पदमाकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथके तयार करून अवैद्य अग्नीशस्त्रे पकडणेकामी विशेष मोहीम राबविली होती. त्याप्रमाणे विशेष पथकातील
अधिकारी/कर्मचारी यांनी दिनांक ०६/१०/२०१९ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम पानशेत बाजारपेठेमध्ये एक केसरी रंगाचा टी शर्ट व काळे रंगाची ट्रॅक पॅट घातलेला इसम त्याचे जवळ पिस्टलसारखे हत्यार आहे अशी माहीती मिळाल्याने पो.स.ई. अमोल गोरे, सहा.फौज.दिलीप जाधवर, श्रीकांत माळी, पो.हवा.रविंद्र शिणगारे, पो.हवा.राजू चंदनशिव, पो.कॉ.अमोल शेडगे यांनी 2:00 वा.चे सुमारास पानशेत बाजारपेठेमध्ये, ता.वेल्हा, जि. पुणे येथून इसम नामे रामा बबन मरगळे, वय २४ वर्षे, रा. पानशेत कुरण बुद्रुक, वरचीवाडी, ता. वेल्हा, जि. पुणे यास ताब्यात घेवून दोन पंचांचे समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत राऊंड अशा रू. 10,200/-किंमतीचा मुद्देमाल मिळून आलेला असून त्याचेविरूध्द वेल्हा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. देवकर यांचे मार्गदर्शनाखाली वेल्हा पोलीस स्टेशन येथे करण्यात येणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत यापुढेदेखील अशाच प्रकारच्या कारवाई सुरू राहणार आहेत.