Home शहरे मुंबई एमजीएममध्ये १०० खाटांची सुविधा

एमजीएममध्ये १०० खाटांची सुविधा

0
एमजीएममध्ये १०० खाटांची सुविधा

[ad_1]

म. टा. वृत्तसेवा, पनवेल

पनवेल महापालिकेसोबत झालेल्या कराराप्रमाणे कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात करोना रुग्णांसाठी १०० खाटांची सुविधा सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये व्हेंटिलेटर खाटांची सुविधाही असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पनवेल महापालिकेने स्वखर्चातून एमजीएम रुग्णालयात करोना रुग्णांना सुविधा द्यावी, या मागणीसाठी आमदार बाळाराम पाटील, प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न सुरू केले होते. प्रशांत ठाकूर यांनी थेट आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्य सरकारने स्वखर्चाने एमजीएम रुग्णालयात नागरिकांना सुविधा द्यावी, अशी मागणी केली होती. या प्रयत्नांनंतर अखेर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महासभेत एमजीएमसोबत २०० खाटांच्या सुविधेचा करार करण्यासाठी तातडीचा प्रस्ताव महासभेत मांडला होता. महापालिकेला आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी १६ कोटी ५ लाख रुपये खर्च येणार आहे. तसेच रुग्णालयातील मनुष्यबळाला वेतन आणि इतर खर्चासाठी महिन्याला तीन कोटी रुपये खर्च येणार आहे. पुढील सहा महिन्यांसाठी अंदाजित १८ कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता लक्षात घेऊन एकूण ३४ कोटी रुपयांच्या खर्चाला महासभेने मान्यता दिली. काही दिवसांपूर्वी एमजीएम आणि महापालिका प्रशासनात झालेल्या कराराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर अपेक्षेप्रमाणे १ मेपासून एमजीएम रुग्णालयात १०० खाटांची सुविधा देण्यास सुरुवात झाली. महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह प्रशासनाने ही पाहणी करून नागरिकांना एमजीएम रुग्णालयात मोफत सुविधा दिली जाणार असल्याचे घोषित केले. पहिल्या टप्प्यात देण्यात आलेल्या या सुविधेत १०० खाटांमध्ये काही व्हेंटिलेटर खाटांचीही सुविधा आहे. उर्वरित १०० खाटा देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. अल्पावधीतच ही सुविधादेखील देण्यात येईल, अशी माहिती एमजीएम व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

शेकापने मानले एमजीएमचे आभार

एमजीएमसोबत करार करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणाऱ्या शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी एमजीएमचे विश्वस्त डॉ. सुधीर कदम यांची भेट घेऊन नव्याने सुरू करण्यात आलेल्या सुविधेची माहिती घेतली. कठीण काळात नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन महापालिकेला सहकार्य केल्याबद्दल एमजीएम व्यवस्थापनाचे आभार मानले. यावेळी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, शेकाप महापालिका जिल्हाध्यक्ष नगरसेवक गणेश कडू, महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे आदी उपस्थित होते.

[ad_2]

Source link