एरंडोल:- तालुक्यात एका बाजूला कोरोना रुग्णांची संख्या वाढत असलेली दिसून येते. मात्र मंगळवारी एकाच दिवशी एरंडोल कोविड केंद्रातून ४४ रुग्णांवर यशस्वी उपचार होऊन ते कोरोना मुक्त झाले. खऱ्या अर्थाने कोरुना रुग्णांची संख्या व बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या पहाता थोडी खुशी थोडा गम अशी स्थिती दिसून येते तथापि एकाच दिवशी ४४ रुग्णांची घरवापसी झाली ही बाब मोठा दिलासा देणारी आहे.
एरंडोल शहरासह ग्रामीण भागात अजूनही कोरोनाची नागरिकांमध्ये भीती आहे तसेच भीती बरोबर आपण कोरोना रुग्ण झालो तर आपली गावात समाजात व सर्वत्र बदनामी होईल ही भीती कोरोना पेक्षा कित्येक पटीने जास्त असल्याचे आढळून येते. आतापर्यंत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या४८५ आहे.
त्यापैकी ३५४ जन कोरोना मुक्त झाले. बरे होण्याची टक्केवारी ७२% आहे. त्यामुळे कोरोना ची लागण झाली की नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना करावी असे प्रशासनातर्फे वेळोवेळी आव्हान करण्यात आले आहे काही लोकांच्या बेजबाबदार पणामुळे व दुर्लक्षामुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचे सांगण्यात आले. नाका तोंडाला मास्क व बाहेर पडताना सोशल डिस्टंसिंग चे पालन तसेच सॅनिटायझर चा वापर या प्राथमिक उपाययोजनांचा अवलंब केला तर परिस्थितीत बदल होऊ शकतो.
फोटो ओळ:-एरंडोल कोवाड सेंटर मधून घर वापसी झालेले ४४ रुग्ण सोबत प्रांताधिकारी विनय गोसावी,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फिरोज शेख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कैलास पाटील डॉक्टर रोहित वाणी, दिपक गायकवाड व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.