एरंडोल तालुका व शहर शिवसेना युवा सेनेच्या वतीने व्यंकय्या नायडू चा जाहीर निषेध.

- Advertisement -

एरंडोल:-येथील तालुका व शहर शिवसेनेच्या व युवासेनेच्या वतीने एरंडोल तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना निवेदन देऊन राज्यसभेतील घटनेचा व वेंकैया नायडू यांचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.यावेळी व्यंकय्या नायडू यांचा राजीनामा घ्यावा व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणाबाजीसह ‘जय भवानी जय शिवाजी’ चा नारा देत शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालय दणाणून सोडले व तहसीलदारांना निवेदन दिले.


याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, शिवसेना उपजिल्हा संघटक किशोर निंबाळकर,शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील,शिवसेना तालुका संघटक राजेंद्र चौधरी,पंचायत समिती उपसभापती अनिल महाजन, एरंडोल युवा सेना तालुका प्रमुख बबलू पाटील,शिवसेनेचे नेते शालिग्राम गायकवाड,शिवसेना शहर संघटक नितीन बिर्ला, एरंडोल शहराचे कार्यकर्ते आनंदा चौधरी छोटू भगत,सामाजिक कार्यकर्ते चिंतामण पाटील,शिवसेना विभाग प्रमुख देशमुख,राठोड, जळूचे माजी सरपंच रवींद्र जाधव,छोटू मराठे गोविंद राठोड,शिवसेना शहरचे युवा सेना शहर समन्वयक अमोल भावसार,कुणाल पाटील, कृष्णा ओतारी,व्यापारी आघाडी प्रमुख परेश बिर्ला,हरीश पांडे, शरद पाठक यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते…

- Advertisement -