Home शहरे जळगाव एरंडोल तालुक्यात कोरोना स्थितीत सुधारणा

एरंडोल तालुक्यात कोरोना स्थितीत सुधारणा

0
एरंडोल तालुक्यात कोरोना स्थितीत सुधारणा

जळगांव जिल्हा ( एरंडोल ) :- शैलेश चौधरी

एरंडोल तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात लॉकडाऊन लागल्यानंतर कोरोना स्थितीत सुधारणा होत असल्याचे दिसून येते त्यामुळे कोरोना लाट ओसरत असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.एरंडोल येथे नविन रूग्णसंख्येत सुध्दा कमालिची घट होत आहे. या वृत्ताला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख यांनी दुजोरा दिला आहे.
एरंडोल ग्रामीण रूग्णालयात रविवारी सहा ऑक्सिजन बेड तर एरंडोल शासकीय कोविड केअर सेंटर मध्ये एकशे दहा साधे बेड रिक्त असल्याची माहीती वैद्यकीय अधिक्षक डॉ. कैलास पाटील यांनी दिली आहे.
एरंडोल येथे रविवारी एकशे सकरा चाचण्या घेण्यात आल्या व ग्रामीण भागात एकशे एकोणविस चाचण्या घेण्यात आल्या.
दरम्यान येथे कडक लॉकडाऊन राबविण्यासाठी विक्रेते,दुकानदार यांनी प्रशासनाला या पुढच्या काळातही सहकार्य केले तर कोरोना चे चिञ अजुन वेगाने बदलू शकते.
काही विक्रेते ग्राहकांना दुकानात घेऊन बंद शटरआड मालाची/वस्तूची विक्री करतात अशी माहीती पुढे येत आहे. न.पा.प्रशासनाने धडक मोहीम राबवून अश्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आतापर्यंत तालुक्यातील ५७२४रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच बरे होण्याच्या दरात काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.रूग्ण बरे होण्याचा दर ८९ पर्यंत पोहोचला आहे.