Home शहरे जळगाव एरंडोल नगर पालिकेची प्लॅस्टिक विरोधात धडक मोहीम

एरंडोल नगर पालिकेची प्लॅस्टिक विरोधात धडक मोहीम

0

प्रतिनिधी – एरंडोल नगर पालिकेने सध्या शहरात प्लॅस्टिक बंद मोहिमेला पुन्हा सुरुवात केलेली असुन शहरातील महावीर आईस्क्रीम या दुकानातून ५० मायक्रोन पेक्षा कमी असलेले प्लॅस्टिक मिळाल्याने त्या दुकानदारा कडुन ५००० /-रुपयांचा दंड आकारण्यात आला.
यावेळी क्षेत्रीय अधिकारी एस.आर.ठाकुर यांनी एरंडोल नगर पालिकेचे सुरुवाती पासुनच प्लॅस्टिक मुक्त शहर बनविण्यासाठी प्रयत्न असुन आता पर्यंत १ लाख ८५ हजार रुपयांचा दंड वसुल केला असल्याचे सांगितले.मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी शहर प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी,शहर वासीयांनी एरंडोल नगर पालिकेस सहकार्य करावे असे अवाहन केले आहे.प्लॅस्टिक मुक्त अभियान पथकात एरंडोल नगर पालिकेचे क्षेत्रीय अधिकारी आर.एस.ठाकूर,ए.पी.चौधरी,अशोक महाजन,विनोद जोशी,सलीम पिंजारी आदी सहभागी आहेत.
फोटो ओळी – एरंडोल येथील महावीर आईस्क्रीम च्या दुकानात कारवाई करतांना क्षेत्रीय अधिकारी आर.एस.ठाकुर, अशोक महाजन,सलीम पिंजारी,ए.पी.चौधरी आदी.