एरंडोल येथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या सभेत विधानसभा निवडणुकी संबंधी विविध विषयांवर चर्चा.

- Advertisement -

एरंडोल : येथे तहसीलदारांच्या दालनात २० सप्टेबर २०१९ रोजी  निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन आदर्श आचार संहितेसह नामनिर्देशन पत्र दाखल करणे,प्रचारसभा,उमेदवारांचा निवडणुक खर्च व इतर निवडणुकी संबंधीच्या विविध विषयांवर चर्चा झाली.तसेच विनय गोसावी यांनी प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन सविस्तर माहिती दिली. त्यानंतर मान्य प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना वरही.व्ही.पॅट मशीन (मतदान यंत्राचे) स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवले व समजून दाखवले त्या बाबतीतले समज गैरसमज दूर केले
  यावेळी तहसिलदार अर्चना खेतमाळीस,भाजप चे तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील,शिवसेनेचे तालुका प्रमुख वासुदेव पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील,दत्तु पाटील,डॉ.राजेंद्र देसले, प्रा.प्रतापराव पवार,मनसे तालुकाध्यक्ष विशाल सोनार,ईश्वर बिऱ्हाडे,प्रविण बाविस्कर,दादाभाऊ शिरसाठ,बबलु पाटील,जावेद मुजावर आदी पक्षाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

- Advertisement -