Home गुन्हा एरंडोल येथे २५०००/- रू. किमतींची बी एस. एन. एल ची केबल चोरी

एरंडोल येथे २५०००/- रू. किमतींची बी एस. एन. एल ची केबल चोरी

0

एरंडोल : प्रतिनिधी – एरंडोल येथे अंजनी नदीच्या काठावर पुलानजीक जमिनीतून भारत संचार निगम ची ५० मीटर केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.०० वा. च्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एरंडोल पो. स्टे. ला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
याबाबत पो . स्टे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भारत संचार निगमची फोन व इंटरनेटची सेवा सुरू असतांना फोन व इंटरनेट बंद असल्याची तक्रार एरंडोल येथील बी.एस.एन.एल च्या कार्यालयाला करण्यात आली. त्याबाबत दखल घेत लाईनमन पी. यु. पाटील हे जमिनीत पुरलेल्या केबलच्या मार्गाची पाहणी करत असताना अंजनी पुलाजवळ १०० पेअर ची ५० मीटर केबल सुमारे २५०००/- रुपये किमतीची चोरीला गेल्याचे आढळून आले. म्हणून ज्यु. इजि. योगेश कासार यांनी एरंडोल पो. स्टे. ला फिर्याद दिली.त्यावरून अज्ञात चोरट्यानं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पो. नि. स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हँ. काँ. सुनील लोहार, अकील मुजावर, संदीप सातपुते हे पुढील तपास करीत आहे.