Home गुन्हा ए.टी.एम, मध्ये अपहार करणाऱ्या दोन आरोपींना रोकड जप्त करून अटक.

ए.टी.एम, मध्ये अपहार करणाऱ्या दोन आरोपींना रोकड जप्त करून अटक.

0

पुणे : परवेज शेख

बारामती : ए .टी.एम. मशीनमध्ये पैसे भरणा करणारे कंपनीचे कामगार नामे १) विकी विलास पवळ वय.२५ वर्षे, रा.शहाजीनगर भोडणी, ता.इंदापुर, जि.पुणे, २) अभिजित कोयनाप्पा मदने वय.२५ वर्षे, रा.झारगडवाडी, ता.बारामती, जि.पुणे यांनी सदर कंपनीचा विश्वासघात करून एक कोटी एक लाख आठ हजार आठशे रूपयांचा अपहार करून

फसवणुक केल्याचे कंपनी सरप्राईज ऑडिटमध्ये निष्पन्न झाल्याने सदरबाबत रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रा.लि. कंपनीतर्फे संदिप बाळासाहेब इंगवले, वय.३८ वर्षे, धंदा- खाजगी नोकरी, बॅच मॅनेजर, रायटर बिझनेस सर्व्हिसेस प्रा.लि., रा.घर क.७६, चंद्रकिसन निवास, औंध कॅम्प, पिंपळे निलख, पुणे यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. सदर गुन्हयाचे अनुशंगाने मा. श्री: जयंत मिना सो अपर पोलीस अधिक्षक बारामती यांनी सदर गुन्हयातील अपहरीत रक्कम मोठी असल्याने आरोपींना त्वरित . अटक करून त्यांचेकडून पुर्ण रक्कम जप्त करणेबाबत श्री. नारायण शिरगावकर सो उपविभागीय पोलीस अधिकारी व श्री. औदुंबर पाटील पोलीस निरीक्षक यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार श्री. औदुंबर पाटील पोलीस निरीक्षक यांनी सदर गुन्हयाचा तपासाबाबत तपास अधिकारी पो.स.ई. पदमराज गंपले व गुन्हेशोध पथकाचे कर्मचारी यांना सदर गुन्हयातील आरोपीतांनी अपहरित रक्कम ही दि.०१/०६/२०१९ ते दि. २०/०९/२०१९ रोजीचे दरम्यान काढली असून रक्कम मोठी असून पोलीस खात्यातील अनुभव व कौशल्याचा वापर करून आरोपींना अटक करून त्यांचेकडून गुन्हयातील संपुर्ण अपहरित’ रक्कम जप्त करणेबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार पो.स.ई.गंपले यांनी गुन्हेशोध पथकाचे कर्मचारी घेवून कौशल्याचा वापर करून दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस कोठडी घेवून त्यांचेकडे अपहरित रकमेबाबत तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली असून त्यांचेकडुन गुन्हयातील संपुर्ण अपहरित रक्कम १,०१,०८,८००/- रूपये (एक कोटी एक • लाख आठ हजार आठशे रू.) जप्त करणेत आली आहे. सदरच्या कामगिरीचेबाबत मा. श्री.जयंत मिना सो अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग यांनी श्री. औदुंबर पाटील पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक पदमराज गंपले व. गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री.जयंत मिना साो अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, श्री. नारायण शिरगावकर सो उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली श्री. औदुंबर पाटील पोलीस निरीक्षक, पो.स.ई. श्री. पदमराज गंपले, योगेश शेलार, सहाय्यक फौजदार संदिपान माळी, पो.हवा. संजय जगदाळे, पो.कॉ. रूपेश साळुके, तुषार सानप, अंकुश दळवी, पोपट नाळे, सिध्देश पाटील, नुतनकुमार जाधव, .तुषार चव्हाण, अजित राऊत, योगेश कुलकर्णी, संध्या कांबळे यांनी केली.