ऐरोली व नेरुळ विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक कारवाई

- Advertisement -

“प्लास्टिकमुक्त नवी मुंबई” हा निर्धार करीत नागरिकांकडून प्लास्टिकचा वापर टाळणे व पर्यायी कागदी / कापडी पिशव्यांचा वापर करणे यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनानुसार मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येणा-या प्लास्टिक प्रतिबंध मोहिम अंतर्गत ऐरोली विभाग कार्यक्षेत्रातील दुकानदार व फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रतिबंधात्मक प्ला‍स्टिकचा वापर करणाऱ्या  दुकानदारांवर रु. 15 हजार इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांकडून रु.1750/- इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी ऐरोली विभागाचे स्वच्छता अधिकारी श्री. सुभाष म्हसे, स्वच्छता निरिक्षक श्री. विजेंद्र जाधव, श्री.नितीन महाले, उप स्वच्छता निरीक्षक श्री. मिलिंद तांडेल, श्री. मनिष सरकटे, श्री. नरेंद्र विचारे व स्वच्छाग्रही उपस्थित होते.

त्याचप्रमाणे नेरुळ विभाग कार्यक्षेत्रातील दुकानदार व हॉटेल व्यावसायिकावर धडक कारवाई करीत 50 कि.ग्रॅ. प्ला‍स्टिकच्या वस्तू जप्त करण्यात आल्या तसेच रु.15 हजार इतकी दंडात्मक रक्कम घेण्यात आली. यावेळी नेरुळ विभाग कार्यालयातील विभाग अधिकारी श्री. संजय तायडे, स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे, स्वच्छता निरिक्षक श्रीम. जयश्री अढाळ, श्री. अरुण पाटील, उप स्वच्छता निरिक्षक श्री. अजित तांडेल, श्री. विरेंद्र पवार, श्री. भुषण सुतार व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कर्मचारी स्वच्छाग्रही उपस्थित होते.5 Attachments

- Advertisement -