Home शहरे कोल्हापूर ‘ऑक्सिजन टँकर पाठवलाय…तिथे स्वत: थांब’; मध्यरात्री अजित पवारांच्या फोननंतर रोहित पाटलांची धावपळ

‘ऑक्सिजन टँकर पाठवलाय…तिथे स्वत: थांब’; मध्यरात्री अजित पवारांच्या फोननंतर रोहित पाटलांची धावपळ

0
‘ऑक्सिजन टँकर पाठवलाय…तिथे स्वत: थांब’; मध्यरात्री अजित पवारांच्या फोननंतर रोहित पाटलांची धावपळ

[ad_1]

हायलाइट्स:

  • अजित पवारांनी मध्यरात्रीच केला रोहित पाटलांना फोन
  • ऑक्सिजन टँकर पाठवल्याची दिली माहिती
  • अजित पवारांचा फोन आल्यानंतर रोहित पाटलांची धावपळ

सांगली : महाराष्ट्रासह देशात करोनाची दुसरी लाट आल्यानंतर रुग्णसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली. अचानक वाढलेल्या या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आणि रुग्णांचे हाल होऊ लागले. त्यामुळे रुग्णांना बेड, इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवठा करताना शासन आणि प्रशासनाची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. सांगलीतील तासगाव तालुक्यातही अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या तालुक्यासाठी ऑक्सिजन टँकरची व्यवस्था केली आणि मध्यरात्रीच फोन करून याबाबत दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांना याबाबत सूचना दिल्या.

‘ऑक्सिजन टँकर पाठवला आहे…तू स्वत: थांबून तो उतरवून घे,’ असं अजित पवारांनी रोहित पाटील यांना सांगितलं. थेट अजित पवारांकडूनच सूचना आल्याने रोहित पाटील हे मध्यरात्री साडेबारा वाजताच सदर ठिकाणी दाखल झाले आणि ज्या रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आला होता, तिथे तो पोहोचवण्यात मदत केली. शनिवारी मध्यरात्री ही संपूर्ण घटना घडली.

चंद्रकांत पाटलांनी माझा कोणता पुतण्या शोधून काढला?: छगन भुजबळ

‘रात्री उशिरा १२.३० वाजता तासगाव आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालातील ऑक्सिजन सिलिंडर संपल्याचे कळाले. तत्काळ सांगली येथे जाऊन ऑक्सिजन प्लांट येथे भेट देऊन ऑक्सिजन उपलब्ध करून घेतले. मी तेथील सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, लोकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत,’ अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील इतर भागांप्रमाणेच सांगली जिल्ह्यातही करोना व्हायरसने थैमान घातलं आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. परिणामी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. यातून मार्ग काढण्याचं मोठं आव्हान लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासमोर आहे.

[ad_2]

Source link