Home ताज्या बातम्या ऑनलाइन भडेकारर संकेतस्थळ मागील महिन्यापासून सलाईन वर

ऑनलाइन भडेकारर संकेतस्थळ मागील महिन्यापासून सलाईन वर

0

ऑनलाइन भडेकारर संकेतस्थळ मागील महिन्यापासून सलाईन वर

परवेज शेख मागील महिन्याचा 23 तारखे पासून ऑनलाइन भाडे कराराचे संकेतस्थळ या न त्या कारणाने बंद पडत असून बाहेरगावाहून येणाऱ्या नोकरदार, महिला व ज्येष्ठ नागरिक यांची परवड होत आहे आय- सरिता प्रणाली वर यूआयडी संकेतस्थळ व ग्रास पेमेंट संकेतस्थळ जोडून भाडेकराराचे संकेतस्थळ तयार झाले आहे माजी नोंदणी महानिरीक्षक श्रीकर परदेशी साहेब यांच्या प्रयत्नातून हे संकेतस्थळ सुरू झाले असून नागरिकांच्या मिळकती साठी कायदेशीर चौकट आणि शासनाला महसूल मिळवून देणारे हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या महसूल खात्याला संजीवनी देणारे ठरले आहे मागील वर्षीत मार्च 2019 पर्यंत 26 हजार करोड रुपयाचे विक्रमी महसुली उत्पन्न मिळवून देणारे महसूल खाते चे ऑनलाईन भाडेकराराचे संकेतस्थळ अगदी निष्प्रभ ठरले असून सब रजिस्टर ऑफिस मधील बकालपणा, असुविधां आणि अत्यंत खराब आसन व्यवस्था अशी ख्याती या खात्याची झाली आहे त्यात ऑनलाईन भाडेकरार संकेतस्थळ वेळोवेळी बंद पडणे,ऑनलाईन पोलीस व्हेरिफिकेशन चा उल्लेख दस्तात नसणे,आधी चलन आणि नंतर युआईडी व्हेरिफिकेशन मुळे जेष्ठ नागरिकांचे ठसे न जुळ्याने रिफंड मिळवताना नाकी नऊ येणे अश्या असंख्य त्रुटी असोसिएशन ने वेळो वेळी महसूल खात्या कडे मांडल्या आहेत त्यात कोणतीही सुधारणा होत नसल्याने आज असोसिएशन च्या शिष्ट मंडळाने नोंदणी महानिरीक्षक याना पत्रा द्वारे कळवले असून लवकरच नवनिर्वाचित मुख्यमंत्री महोदय आणि महसूल मंत्री महोदय ह्याच्या कडे दाद मागणार आहे सादर शिष्टमंडळात अध्यक्ष सचिन शिंगवी, सेक्रेटरी -राजेंद्र दोशी, खजिनदार- उमाशंकर यादव, सदस्य-गणेश घुमे, गणेश शेलार ,इ उपस्थित होते