Home ताज्या बातम्या ओपन स्पेस-मोकळी जागा ही विकता येत नाही तसेच त्यावर इमारत बांधता येत नाही – सुप्रीम कोर्ट

ओपन स्पेस-मोकळी जागा ही विकता येत नाही तसेच त्यावर इमारत बांधता येत नाही – सुप्रीम कोर्ट

0

ओपन स्पेस-मोकळी जागा ही विकता येत नाही तसेच त्यावर इमारत बांधता येत नाही – सुप्रीम कोर्ट

दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख

जागेचा प्लॅन मंजूर करताना दाखवलेली मोकळी जागा ही कधीही बदलून त्यावर इमारत बांधता येत नाही तसेच ले आऊट मंजूर केलेला असतो आणि काही जागा ही मोकळी सोडलेली असते परंतु मूळ जागा मालक किंवा विकासक हे सर्व प्लॉट विकून झाले की ती मोकळी जागा दुसऱ्या कुणाला विकतात ते चूक आहे, गुन्हा आहे कारण सदर मोकळ्या जागेची मालकी ही सर्व प्लॉट मालकांची मिळून असते.

दिनांक १७२० रोजी याबाबत सुप्रीम कोर्टाने सिव्हिल अपील क्रमांक 6216-6217/2019 या वर
निकाल दिला आहे. यात अंजुमान ई शिएटे आली व इतर विरूद्ध गुलमोहर एरिया सोसायटी वेलफेअर असोशिएशन
(Civil Appeal No
6216-6217/2019
Anjuman E Shiate Ali & Anr
V/s
Gulmohar Area Societies Welfare
Group & Ors. etc.)

सदर निकालाची प्रत आपण सुप्रीम कोर्ट चे साईट वरून घेऊन आपली अशी मोकळी जागा कोणी विकली असल्यास परत घेऊ शकता.
ग्राहक शक्ती ही एकित आहे आणि फ्लॅट किंवा प्लॉट धारक ग्राहक एकत्र येत नाही त्यामुळे सदर प्रकारचे गुन्हे राजरोस पणे होत असतात.

डेव्हलपमेंट कंट्रोल रुल प्रमाणे सदर मोकळी जागा ही सोडणे बंधनकारक असते कारण अशी जागा सोडली नाही तर लोकांना श्वास घेणे साठी हवा मिळणार नाही. शहारा मधे सध्या जागेचे दर गे गगनात गेले आहेत आणि बिल्डर लोक हे लोकांचे एकत्र न येण्याचा फायदा घेतात तसेच सोसायटी मुद्धाम करत नाहीत, जागेचे खरेदी खत करत नाहीत (कन्व्हेयन्स डीड)


तरी याबाबत सर्व फ्लॅट तसेच प्लॉट खरेदी दार लोकांनी जागृत होऊन सोसायटी स्थापन करावी, सोसायटी स्थापन झाली की चार महिन्यांचे आत आपणास जागेची खरेदी करून देणे बिल्डर ला बंधनकारक आहे.
बिल्डर सोसायटी स्थापन करून देत नसेल किंवा खरेदी खत करून देत नसेल तर आपण शासनाची योजना आहे त्यात बिल्डर चे सहकार्य शिवाय सोसायटी स्थापन करू शकता तसेच आपण बिल्डर चे सहकार्य विना खरेदी खत पण करून घेऊ शकता.