हायलाइट्स:
- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावरून घमासान
- काँग्रेस नेते नाना पटोले यांचा भाजपवर आरोप
- भाजपच्या भूमिकेचा निषेध म्हणून उद्या राज्यव्यापी आंदोलन करणार
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ही माहिती दिली. केंद्राच्या धोरणावर पटोले यांनी जोरदार टीका केली. ‘सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे,’ असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
वाचा: ‘अनिल देशमुख यांच्याकडं काहीच सापडत नसल्यामुळं आता…’
‘आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशाऱ्यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे. देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली, पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे. ओबीसींचे हे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे,’ असा आरोपही पटोले यांनी केला. भाजपच्या याच भूमिकेचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोविड नियमांचे पालन करून आंदोलनात सहभागी होतील, असं पटोले यांनी स्पष्ट केलं.
वाचा: चुकीच्या वेळेस चुकीच्या गोष्टी केल्या जाताहेत: वळसे-पाटील