औद्योगिकनगरी आता क्रीडानगरी म्हणून सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर – महापौर जाधव

- Advertisement -

औद्योगिकनगरी आता क्रीडानगरी म्हणून सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर – महापौर जाधव

भूषण गरुड:

भारतीय नकाशावर पिंपरी चिंचवड औद्योगिकनगरी म्हणून प्रसिद्ध आहेच, पण एशियन योगासन स्पर्धेत सलग नऊवेळा सुवर्णपदके मिळून पांगारे यांनी या नगरीची ओळख क्रीडानगरी म्हणून करून दिली आहे असे एशियन खेळाडूंचे सत्कारावेळी बोलताना महापौर राहुल जाधव यांनी सांगितले. 
९व्या आशियाई योगासन २०१९ चॅम्पियनशिप चषक क्रीडा स्पर्धेत भारताला पिंपरी चिंचवडचे चंद्रकांत पांगारे व श्रेया कंधारे यांनी सुवर्णपदक मिळवून दिल्या बद्दल पिंपरी चिंचवडकरकडून सत्कार घेण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय योगपटू चंद्रकांत पांगारे यांनी ॲथलेटिक योगा – सुवर्णपदक आणि श्रेया कंधारे हिने ॲथलेटिक योगासन – सुवर्णपदक, आर्टीस्टिक योगा सोलो – सुवर्णपदक, आर्टीस्टिक पेअर योगा – सुवर्णपदक, आर्टीस्टिक पेअरयोगा – रौप्य पदक, रिट्मीक योगा – रौप्य पदक, फ्री फ्लो योगाडान्स – सुवर्णपदक असे योगासनाच्या प्रकारात दोघांनी वैयक्तिक पदकाची कमाई करात ६ पदके भारतीय संघासाठी मिळवली. भारताला ९व्या अशियाई योगासन २०१९ चॅम्पियनशिप चषक मिळवून देणारे चंद्रकांत पगारे व श्रेया कंधारे यांचा शुक्रवार दिनांक १३ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ७:०० वा. सुमारास ज्ञान प्रबोधनी नवनगर विद्यालय, क्रीडाकूल, निगडी, पुणे याठिकाणी पिंपरी-चिंचवडचे विद्यमान महापौर राहुल (दादा) जाधव यांच्या हस्ते, तुषारची हिंगे(क्रीडासदस्य,पुणे मनपा), रमेश गावडे नगरसेवक, निलेश पंढारकर मा.नगरसेवक, सदाशिव (आण्णा) पवार उद्योगपती, रामभाऊ पंढारकर आदर्श उद्योगपती, आनंदभाऊ कंधारे सरपंच, शरदराव नानेकर सरपंच, पुणे डिस्टिक योगा अँड फिटनेस इन्स्टिट्यूटचे योगापटू, हितचिंतक व नागरिकांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ करण्यात आला.

गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर ते रविवार ८ सप्टेंबर २०१९ या दरम्यान साऊथ कोरिया येथे एशीयन योगा फेडरेशन यांच्या अधिपत्याखाली व साऊथ कोरिया योगा फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ९व्या आशियाई योगा स्पोर्ट्स चँपियनशिप २०१९चे आयोजन करण्यात आले होते. आशियाखंडातील सिंगापूर ,मलेशिया ,साऊथ कोरिया, व्हियेतनाम ,मंगोलिया ,हम कोम , इंडिया आणि इराण इत्यादी देशांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे उद्घाटन एशीयन योगा फेडरेशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल व साऊथ कोरिया योगा फेडरेशनचे अध्यक्ष ली यांच्या हस्ते झाले. भारतातून एकूण ३६ स्पर्धक स्पर्धेत विविध वयोगटातून या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील एकूण ७ स्पर्धकांनी या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. कळविण्यास आनंद वाटतो की पिंपरी-चिंचवड पुण्यातील आंतरराष्ट्रीय योगपटू कु. श्रेया कंधारे व चंद्रकांत पंगारे यांनी एकूण सहा पदकांची कमाई केली. श्रेया कंधारे हिनी अॅथलेटीक योगासन या प्रकारांमध्ये सुवर्णपदक ,आर्टिस्टिक योगा सोलो या प्रकारामध्ये सुवर्णपदक, आर्टिस्टिक पेअर या प्रकारांमध्ये  रोप्य पदक, रिदमिक योगामध्ये रोप्य  पदक व फ्री फ्लो योगा डान्स या प्रकारांमध्ये सुवर्णपदक अशा एकूण पाच पदकाची कमाई केली. तर श्री पांगारे यांनी अॅथलेटीक योगा या प्रकारांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली.
कळविण्यात अत्यंत अभिमान वाटतो की भारतीय संघाने सर्वात जास्त पदकांची कमाई करून ९व्या आशियाई योगासन चँपियनशिप २०१९ हा चषक पटकावला व सर्वसाधारण विजेतेपद मिळवले तर व्हियेतनाम योगासन संघाने फस्ट रणरअप तर सिंगापूर योगा संघाने सेकंड  रणरअप हा चषक पटकावला. सर्व विजेत्या स्पर्धकांनी महाराष्ट्र योगा असोसिएशन चे अध्यक्ष माननीय श्री परमानंद महाराज व योगा फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री अशोक अग्रवाल यांचे विशेष मार्गदर्शन लाभले अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष सौ. अनिता गायकवाड यांनी दिली. चंद्रकांत पांगारे यांची ही ९वी आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धा असून त्यांनी आत्तापर्यंत सलग ९ वेळा सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. त्याचबरोबर चंद्रकांत पांगारे यांनी भारतीय योगा संघाचे कोच आणि कॅप्टन म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

- Advertisement -