Home शहरे उस्मानाबाद औरंगाबादच्या बियाणे कंपनीवर कळंबमध्ये गुन्हा दाखल

औरंगाबादच्या बियाणे कंपनीवर कळंबमध्ये गुन्हा दाखल

0

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । १३ जुलै : पेरणीनंतर सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार आणि तिबर पेरणी करावी लागली. याच्या तक्रारी सातत्याने वाढत असल्याने शासनाच्या कृषी विभागाने शेतात जाऊन पाहणी केली होती. त्यात महाबीज आणि ग्रीनगोल्ड या कंपनी विरुद्ध तक्रारी होत्या. याची दखल घेत औरंगाबाद येथील एका कंपनी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाळूज येथील ग्रीनगोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या बियाणे उत्पादक कंपनीचे संचालक संदीप मच्छींद्र बावीसकर यांचे विरुद्ध उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीच्या आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्यांना दर्जाहीन सोयाबीन बियाणे पुरवठा केला. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. संबंधीत बियाणे उत्पादक कंपनीने शेतकऱ्यांची व शासनाची फसवणुक केली आहे. अशी फिर्याद कळंब येथील कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक विरेश विलास अंधारी यांनी दिली आहे.