हायलाइट्स:
- कंगनाचं ट्विटर अकाउंट बंद झाल्यावर बॉलिवूड कलाकारांनी व्यक्त केला आनंद
- इन्स्टाग्राम अकाउंटदेखील बंद करण्याची केली मागणी
- कू अॅपवर व्हिडीओ बनवण्याचा दिला कंगनाला सल्ला
कोणाचंही नाव न घेता अभिनेत्री रिचा चड्ढाने एक मीम शेअर केरत लिहिलं की, ‘स्वतःचं म्हणणं मांडा पण दुसरीकडे कुठेतरी जाऊन.’ रिचाच्या या ट्वीटचा संबंध कंगनाशी जोडत युझर्सनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘कंगनाचं अकाउंट सस्पेन्ड होणं ही पहिली लाट आहे, दुसऱ्या लाटेत ती नव्या विषाणूंसह पुन्हा येईल.’ आणखी एका युझरने लिहिलं, ‘आयपीएल आणि कंगनाचं अकाउंट सस्पेन्ड झालं, देशात मनोरंजनाची खूप कमतरता निर्माण झाली.’
अभिनेत्री स्वरा भास्करने एका फॅशन हाऊसमधून कंगनाला काढून टाकण्याची बातमी शेअर करत लिहिलं, ‘हे पाहून मी खूप आनंदित आहे.’ अभिनेता गुलशन देवैयाने ट्वीट करत लिहिलं, ‘प्रत्येक गोष्टीवर बोलून तिने स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. बिचाऱ्या विराटचं विनाकारण नाव घेतलं गेलं.’
चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी लिहिलं, ‘फुल नौटंकी.’ तर अभिनेत्री कुब्रा सैतने लिहिलं, ‘मी विचार केला होता की जेव्हा मी त्यांना भेटेन तेव्हा माझ्या डाव्या पायाने त्यांच्या पायात पाय घालून पाडण्याचा प्रयत्न करेन पण ही पद्धतही चांगली आहे. मला कायमस्वरूपी शांतता हवी आहे आणि सोशल मीडिया त्यांच्याशिवाय चांगला आहे.’
अभिनेत्री बिदिता बाग यांनी लिहिलं, ‘चला या सोबतच मॅडमच इन्स्टाग्राम अकाउंट पण बंद करून टाका मॅडम तुम्ही तुमचे व्हिडीओ ‘कू’वर जाऊन बनवा.’