हायलाइट्स:
- कंगनाने केलेल्या ट्विटची कविता कौशिकने उडवली थट्टा
- कविताचं ट्विट पाहून नेटकऱ्यांनी केलं तिलाच ट्रोल
- नेटकऱ्यांनी कविताला दिला काम शोधण्याचा सल्ला
करोना- वडिलांचं छत्र हरवलेल्या मुलाला सलमानची लाखमोलाची मद
ट्विटर अकाउंट सस्पेण्ड झाल्यावर कंगनाने म्हटलं होतं, ‘अमेरिकेतील गोरे लोक आजही आपल्यावर राज्य करू पाहत आहेत. आजही ते आपल्याला गुलाम बनवू इच्छित आहेत आणि देशातील जनता त्या लोकांसाठी दुःखी होतेय ज्यांनी आपल्यावर इतकी वर्ष राज्य केलं.’ कंगनाच्या या वक्तव्याची फिरकी घेत कविताने ट्वीट केलं आणि लिहिलं, ‘कोणत्या काळाची गोष्ट सांगतेयस? आजकाल तर ते बिचारे परदेशी आपल्या चित्रपटातील गाण्यांवर बॅकग्राऊण्ड डान्सर म्हणून नाचताना दिसतात. परदेशी लोकांचा मान ठेवून बोलतेय.’ कविताचं हे ट्वीट तिच्यावरच भारी पडलं.
कविताच्या ट्वीटला नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आणि तिला ट्रोल केलं. कविताला नेटकऱ्यांनी काम शोधण्याचा सल्ला दिला. एका युझरने लिहिलं, ‘तुला तर कोणी ते कामदेखील देत नाहीये. ‘बिग बॉस’ मधून अपमान करून बाहेर हाकललं गेलं होतं.’ आणखी एका युझरने लिहिलं, ‘कंगनाचं अकाउंट सस्पेण्ड झालंय म्हणून बोलताय तुम्ही.’ दुसऱ्या युझरने लिहिलं, ‘ज्याला काही काम नसतं तो व्यक्ती अशा गोष्टी करत राहतो.’ आणखी एका युझरने लिहिलं, ‘कविता कौशिक तू चिंता करू नको ती तुझ्यासारखी बेरोजगार आणि फ्लॉप अभिनेत्री नाहीये.’
अभिलाषा पाटील यांचं करोनाने निधन, ‘छिछोरे’त केली होती भूमिका