कंटेनर चालकाला मारहाण करून लुटले

- Advertisement -

पांढरीपूल येथील हॉटेलच्या पार्किंगमधील घटना

नगर: नगर-औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपूल परिसरातील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये कंटेनर चालकाला मारहाण करून लुटण्यात आले. 17 हजार 500 रुपयांची रोकड हिसकावून नेण्यात आली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, इलियास चाहत खान (रा. खानपूर घाटी, ता. नगीना, जि. नुहू, रा. हरियाणा) यांनी पांढरीपूल येथील हॉटेल शिवनेरीच्या पार्किंगमध्ये कंटेनर लावला होता. कंटेनरमध्ये ते झोपले होते. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तीन जण कंटेनरच्या केबिनमध्ये घुसले. धारदार वस्तूने त्यांनी खान यांची पाठ व तोंडावर मारहाण केली.

तसेच गाडीबाहेर काढून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून, खिशातील 17 हजार 500 रुपयांची रोख रक्कम काढून घेण्यात आली.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात इलियास खान यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पालवे हे करीत आहेत. अशा घटना वारंवार या परिसरात घडत आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

- Advertisement -