Home ताज्या बातम्या कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील हॉटेल-लॉज सुरु करण्यास परवानगी…

कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील हॉटेल-लॉज सुरु करण्यास परवानगी…

मुंबई :- शफीक शेख

महाराष्ट्रात मिशन बिगीन अगेन अंतर्गत आता हॉटेल्स लॉज सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. कंटेन्मेंट झोन आणि प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी हॉटेल्स सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

८ जुलैपासून हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस अटी आणि शर्तींसह सुरू करता येणार आहेत. संपूर्ण क्षमतेपेक्षा ३३ टक्के क्षमतेने हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊसचा वापर करता येणार आहे असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.

मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील व्यवसाय, व्यापार, कंपन्या सुरू झाल्या होत्या मात्र, हॉटेल व्यवसाय बंदच होता. पण आता सरकारने हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्यास परवानगी दिली आहे. हॉटेल्स सुरू करण्याच्या संदर्भातील आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी काढले आहेत. सरकारने ही हॉटेल्स सुरू करण्याच्या संदर्भात अटी आणि शर्थी लागू केल्या आहेत.

सरकारने हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी कंटेन्मेंट झोनमध्ये हॉटेल्स, गेस्ट हाऊस, लॉज सुरू करता येणार नाहीयेत. यासोबतच संपूर्ण क्षमतेपेक्षा केवळ ३३ टक्के ग्राहकांनाच आतमध्ये परवानगी देता येणार आहे. तर उर्वरित ६७ टक्के जागा ही क्वारंटाईनसाठी वापरण्याचे आदेशात म्हटले आहे.