कंत्राटी कामगारांसाठी हरियाणा पॅटर्नच्या अंमलबजावणी कार्यवाहीसाठी शासन सकारात्मक – मंत्री ॲड. आकाश फुंडकर – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ३ : कंत्राटी कामगारांसाठी हरियाणा पॅटर्नची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. कामगार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर अहवालाच्या शिफारशीनुसार कार्यवाही करण्यात ये, असे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी सांगितले.

    भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. कामगार विमा योजनेसंदर्भात भारतीय मजदूर संघाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोबत बैठक आयोजित करण्यात येईल, असेही कामगार मंत्री म्हणाले.

    घरेलू कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच नवीन कामगार कायद्यानुसार बांधकाम कामगारांसाठी प्रस्तावित योजनांचे स्वरूप याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    यावेळी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सचिव अनिल डुमणे आणि प्रदेशाध्यक्ष किरण मिलगिर उपस्थित होते.

    ०००००

    निलेश तायडे/विसंअ

     

     

     

     

    - Advertisement -