हायलाइट्स:
- कपिल शर्मानं शेअर केला मुलगा त्रिशानचा पहिला फोटो
- कपिल शर्माच्या मुलाची पहिली झलक सोशल मीडियावर होतोय व्हायरल
- फेब्रुवारी महिन्यात कपिल शर्मा दुसऱ्यादा झाला बाबा
कपिल शर्मानं फादर्स डेच्या निमित्तानं आपल्या दोन्ही मुलांसोबत फोटो शेअर केला आहे. कपिल शर्माच्या मुलाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. कपिलनं शेअर केलेल्या फोटोमध्ये कपिलसोबत त्याची मुलगी अनायरा आणि मुलगा त्रिशान दिसत आहेत. कपिलनं या फोटोसोबत हटके कॅप्शनही दिलं आहे. कपिलनं लिहिलं, ‘पब्लिक डिमांडवरून अनायरा आणि त्रिशान पहिल्यांदा एकत्र.’
कपिल शर्माची पत्नी गिन्नी चतरथनं १ फेब्रुवारी २०२१ रोजी दुसऱ्या बाळाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर कपिलनं त्याची माहिती सोशल मीडियारून दिली होती. पण त्यावेळी त्यानं त्रिशानचा कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. त्रिशानच्या पहिल्या फोटोवर लाखो लाइक्स मिळाले आहेत.
कपिल शर्मा नेहमीच त्याची मुलगी अनायराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. पण त्रिशानचा फोटो त्यानं पहिल्यांदाच शेअर केला आहे. कपिल शर्मानं २०१८ साली गिन्नी चतरथशी लग्न केलं होतं. त्यानंतर डिसेंबर २०१९ साली पहिल्या बाळाला जन्म दिला होता.