Home ताज्या बातम्या कराड:मृत महिलेचा अहवाल निगेटिव्ह

कराड:मृत महिलेचा अहवाल निगेटिव्ह

0

सातारा : कराडमध्ये काल सोमवारी मरण पावलेल्या महिला रूग्णाचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. श्‍वसनसंस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे (सारी) या महिलेचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या 37 संशयितांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 13, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 22, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील 1 व फलटण येथील 1 अशा एकूण 36 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे तसेच कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये काल सोमवारी मृत्यु झालेल्या 70 वर्षीय महिलेचा नमुनाही निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

सोमवारी 20 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात येथे 3 नागरिकांना श्‍वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे तर मंगळवारी 19 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 13, कराड उपजिल्हा रुग्णालयात 14, फलटण उपजिल्हा रुग्णालयात 13, कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील 9 अशा एकूण 71 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच येथे दाखल असणाऱ्या बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचा एक अहवाल पॉझिटिव्ह व दुसरा अहवाल संभ्रमित खपलेपलर्श्रीीर्ळींश असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. त्यामुळे या रुग्णावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आणखी पाच दिवस उपचार व पुनर्तपासणी करुन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. गडीकर यांनी सांगितले.