Home बातम्या राजकारण कराड दक्षिणमध्येही ‘विखे पॅटर्न’; बाळासाहेब थोरातांनंतर ‘मिशन पृथ्वीराज चव्हाण’

कराड दक्षिणमध्येही ‘विखे पॅटर्न’; बाळासाहेब थोरातांनंतर ‘मिशन पृथ्वीराज चव्हाण’

0

सातारा : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातही आता विखे पॅटर्न पहायला मिळतोय. बाळासाहेब थोरात यांच्यानंतर विखे कुटुंबाने आता ‘मिशन पृथ्वीराज चव्हाण’ हाती घेतल्याचं कळतंय. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी ही धो क्याची घंटा आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांनी कराड दक्षिणमध्ये प्रवरेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला. त्यांनी यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांचे विरोधक अतुल भोसले यांना मदत करण्याची भूमिका मांडली.

राजेंद्र विखे पाटील यांनी अतुल भोसले यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार देखील केला. यावेळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले देखील उपस्थित होते.

दरम्यान, राधाकृष्ण विखे -पाटील काँग्रेसमध्ये असताना त्यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत धुसफूस सुरु होती. विखेंनी काँग्रेस सोडल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे विधानसभेच्या निमित्ताने या साऱ्याची परतफेड करण्याचं विखेंनी मनावर घेतल्याचं कळतंय.