हायलाइट्स:
- करिना कपूर खानवर बहिष्कार घालण्याची सोशल मीडियावर मागणी
- ट्विटरवर #BoycottKareenaKhan हा हॅशटॅग ट्रेंड
- करिनावर बहिष्कार घालण्याच्या मागणीमागचे हे आहे कारण
काय आहे कारण
करिनावर बहिष्कार घालण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. यामागचे मूळ कारण म्हणजे एका सिनेमात करिनाने ‘सीतेची’ भूमिका साकारण्यासाठी थोडेथोडके नाही तर तब्बल १२ कोटी रुपयांची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच अशी बातमी सोशल मीडियावरही व्हायरल झाली होती. ही बातमी वाचून संतापलेल्या काहीजणांनी करिनाच्या विरोधात आघाडी उघडली. सर्वांनी मिळून करिनाला ट्रोल करायला सुरुवात केली. त्यातूनच ट्विटरवर #BoycottKareenaKhan हा हॅशटॅग ट्रेंड मध्ये आला आहे.
या सर्व प्रकरणामुळे करिना कपूरवर बहिष्कार घालण्याची आग्रही मागणी होऊ लागली आहे. इतकेच नाही तर सीतेची ही भूमिका एखाद्या हिंदू अभिनेत्रीला द्यावी, असा ही एक सूर यातून उमटू लागला आहे.
लेखक म्हणतो ‘असे काहीच नाही’
दरम्यान, एका वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चित्रपटाचे लेखक के.व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, करिनाला या सिनेमात काम करण्यासाठी अजूनपर्यंत विचारणाच करण्यात आलेली नाही. आता चित्रपटाच्या लेखकाने करिनासंबंधीची बातमी चुकीची असल्याचे सांगितले असल्यामुळे प्रकरण शांत होईल असे वाटत होते. मात्र तसे काही झाले नाही.
सिनेमाशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी खुलासा केल्यानंतरही युझर्सचा संताप कमी झालेला नाही. दरम्यान, या सिनेमात रणवीर सिंगला रावणाच्या भूमिकेची ऑफर दिली होती. मात्र, याबद्दलही अद्याप कुणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

करिनाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे तर, ती लवकरच ‘लालसिंग चड्ढा’ या सिनेमात दिसणार आहे. त्यामध्ये तिच्यासह आमीर खानदेखील आहे. गेल्या वर्षीच या सिनेमाचे चित्रीकरण झाले होते. आता लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.