हायलाइट्स:
- अलिकडच्याच काळात करिना कपूर दुसऱ्यांदा झाली आहे आई
- करिना कपूरनं नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला सोनोग्राफी रिपोर्ट
- करिनाच्या पोस्टवरून चाहते लावतायत करिना पुन्हा प्रेग्नन्ट असल्याचा अंदाज
नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट केल्यानंतर करिना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. करिनाच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिला ‘तू पुन्हा प्रेग्नन्ट आहेस का?’ अशा आशयाचे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. करिनानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती अल्ट्रासाउंड कॉपी दाखवताना दिसत आहे. करिनाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावर चाहत्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून करिनाला भांडावून सोडलं आहे. पण करिनाच्या या पोस्टचा अर्थ काही वेगळाच आहे.
करिना कपूरनं हा फोटो शेअर करताना लिहिलं,’एका वेगळ्या आणि रंजक विषयावर काम करत आहे. पण तुम्ही विचार करताय तसं काही नाही आहे.’ पण करिनाच्या चाहत्यांनी मात्र या पोस्टवरून तिला प्रेग्नन्सीबाबत प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. एका युझरनं लिहिलं, ‘तू पुन्हा आई होणार आहे का? एवढ्या लवकर कसं काय?’ तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, ‘आता पुन्हा एकदा?’ अर्थात युझर्स विचार करत आहेत असं काही नाहीये. करिना पुन्हा आई होणार नाही आहे.
करिना कपूरनं एक पुस्तक लिहिलं आहे. ज्यात तिनं दोन्ही मुलांच्या प्रेग्नन्सीच्या वेळचे तिचे अनुभव आणि माहिती दिली आहे. याच पुस्तकाला तिनं आपला ‘तिसरं बाळ’ म्हटलं आहे. या पोस्टनंतर करिनानं आणखी काही पोस्ट करत आपल्या पुस्तकाची माहिती दिली आहे. करिना कपूरनं २०१६ साली पहिला मुलगा तैमुरला जन्म दिला त्यानंतर २०२१ मध्ये ती पुन्हा एकदा आई झाली आहे. पण चाहत्यांना तिच्या दुसऱ्या मुलाची झलक अद्याप पाहायला मिळालेली नाही.