Home गुन्हा करोडॊ रुपयांचे काजू घेऊन शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक…

करोडॊ रुपयांचे काजू घेऊन शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक…

मुंबई : शफीक शेख ठाणे ; शेतकरी जगला तर देश जगेल, आपल्या देशात शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक असताना, शेतकरी आत्महत्या करत असताना, शेतकऱ्याची दिवसेंदिवस परिस्थिती खराब होत असताना त्यांना कसे सावरता येईल या कडे सरकारपासून सगळ्याच जणांचे प्रयत्न चालू असताना काही भामट्यानी या शेतकऱ्यांचीच फसवणूक केली आहे, या भामट्यांनी थोडीथोडकी नव्हे तर दोन करोड रुपयांची शेतकऱ्यांची फसवणूक केलीआहे, अशा या भामट्यांना ठाणे गुन्हे अन्वेषण युनिट एक ने बेड्या ठोकल्या आहेत आणि शेतकऱ्यांना त्यांचा माल परत केला आहे.

कोल्हापूर बेळगाव परिसरातील काजू उत्पादक शेतकऱ्यांकडून करोडॊ रुपयाचा काजू खरेदी करून त्यांची फसवणूक करून फरार झालेल्या ठाणे येथील अष्टविनायक ट्रेडिंगचे मालक दीपक भाई भरत कुमार पटेल उर्फ अमितकुमार असनानी व सुमितकुमार राजेश असनानी उर्फ महेश भोजराज ग्यानचंदानी हे फरार झाले होते, शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर कोल्हापूरचे राहणारे खालिद शौकतअली मुजावर यांनी ठाणे येथील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्या प्रमाणे आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला, या गुन्ह्याचा समांतर तपास ठाणे गुन्हे शाखा घटक 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व त्यांचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बागुल व त्यांची टीम करत होते, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी यांचा कोणताच ठावठिकाणा नसताना त्यांना गुजरात मधून मोठ्या शिताफीने पोलिसांनी अटक केली, या गुन्ह्यातील आरोपी व त्यांच्या साथीदार यांच्या कडून फसवणूक करून पळवलेल्या काजूगराचे 1909 डब्बे व 146 काजूच्या डब्ब्याची रोख रक्कम, लॅपटॉप, बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, एक बलेनो कार असा मुद्देमाल जप्त केला , तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पोलीस स्टेशन, चंदगड पोलीस स्टेशन, मुरगूड पोलीस स्टेशन, कर्नाटक राज्यातील बेळगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथील चार गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील निम्म्याहून अधिक माल जप्त करण्यात आला, या पाचही गुन्ह्यातील 2234 काजूगराचे डब्बे व रोख रक्कम 58, 07, 000/- असा एकूण 2, 20, 31, 000/- रुपये किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला, पोलिसांनी केलेल्या धडक कारवाई मुळे या फसवणुकीच्या गुन्ह्यातील 606 शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.

या सर्व शेतकऱ्यांनी ठाणे पोलीसांच्या या कामगिरी बद्दल समाधान व्यक्त केले आहे, या फसवणुकीच्या प्रकारा मुळे त्यांना बराच मानसिक त्रास सहन करावा लागला होता, या फसवणुकी मुळे गुलाम रसूल सनदी या शेतकऱ्याचा मुलाने आत्महत्या केली, या फसवणुकीच्या धावपळीत मोठ्या संकटाला तोंड देत असताना नववीत शिकत असलेल्या मुलाकडे त्यांना लक्षच देता आले नाही, त्यामुळे त्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे, या घटनेला ही फसवणूकच जबाबदार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

या सगळ्या शेतकऱ्यांना आयुक्त विवेक फणसाळकर यांनी मोठ्या समारंभ पूर्वक माल परत केला आहे त्यावेळी सगळ्या शेतकऱ्यांनी ठाणे पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.