हायलाइट्स:
- गेल्या सुमारे ५० वर्षांमधील ही सर्वांत मोठी एकल वर्षातील घट
- जननदर गेल्यावर्षी चार टक्क्यांनी घसरून शतकातील नीचांकावर
- जन्मदराची घसरण जवळपास प्रत्येक वयोगटामध्ये
छोट्या कुटुंबाची संकल्पना अमेरिकेत प्रत्येक वंश आणि समुदायामध्ये वाढीस लागली आहे. त्यामुळे जन्मदराची घसरण जवळपास प्रत्येक वयोगटामध्ये दिसत आहे. तरुण दाम्पत्यांमध्ये तर हा विचार खूप आधीपासूनच रुजला आहे. बहुतांश तरुण विवाहिता मातृत्व लांबणीवर टाकत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून तरुण महिलांमधील जननदर घसरत आहे. तिशी आणि चाळिशी उलटलेल्या महिलांमधील जननदर काही प्रमाणात वाढत होता. मात्र गेल्या वर्षी त्यातही घसरण झाली. प्रौढ मातांमधील जननदराचे प्रमाणही कमी होणे ही आश्चर्यकारक बाब आहे, असे अहवालाचे प्रमुख लेखक आणि ‘यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन’चे (सीडीसी) ब्रॅडी हॅमिल्टन यांनी म्हटले आहे.
वाचा:महिलेने ९ बाळांना जन्म दिला, विश्वास नाही बसत तर पाहा फोटो
गेल्या वर्षभरात प्रदान करण्यात आलेल्या ९९ टक्क्यांहून अधिक जन्म दाखल्यांच्या आधारावर हा सरकारी अहवाल तयार करण्यात आला आहे. करोना महामारीमुळे जननदर घसरला असल्याचे विश्लेषण असोसिएटेड प्रेसने २५ राज्यांमधून गोळा केलेल्या सन २०२०च्या माहितीवरून केले होते. या विश्लेषणास सरकारी अहवालाने दुजोराच दिला आहे. करोनाकाळातील चिंता, भीती आणि आर्थिक स्थिती खालावल्याने अनेक दाम्पत्यांनी अपत्याचा विचार लांबणीवर टाकल्याचे प्रमुख कारण समोर आले आहे. तथापि, जननदर घसरण्यामागील अन्य कारणांचा देखील शोध ‘सीडीसी’ घेत आहे.
वाचा: ‘भारत-ब्राझीलमधील अपयशी राजकीय नेतृत्वामुळे करोनाचे थैमान’
अमेरिकेत मागील वर्षी ३.६ दशलक्ष बाळांचा जन्म झाला. वर्ष २०१९ मध्ये ही संख्या ३.७५ दशलक्ष इतकी होती. वर्ष २००७ मध्ये जन्मदर अधिक होता. त्यावेळी ४.३ दशलक्ष बाळांचा जन्म झाल्याची नोंद करण्यात आली.
वाचा: चांगली बातमी! ‘या’ देशात अल्पवयीन मुलांच्या लसीकरणास मंजुरी
आशियाई-अमेरिकन महिलांमधील जननदर आठ टक्क्यांनी कमी झाला. तर, हिस्पॅनिक महिलांमध्ये ३ टक्के, श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीयांमध्ये चार टक्के घट नोंदवण्यात आली. अलास्कामधील जनजाती समुदायांमध्ये ६ टक्के घट नोंदवण्यात आली.