हायलाइट्स:
- दारुच्या अतिसेवनाचा व्यक्तीच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम
- दारू प्राशन केल्यानं करोना विषाणूविरुद्ध सुरक्षा मिळत नाही
- सोशल मीडियावर केले जाणारे दावे खोटे
दारु अधिक प्रमाणात प्राशन केल्यास त्याचा परिणाम व्यक्तीच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यापर्यंत करोना संक्रमण सहजगत्या पोहचू शकतं, असं तलवार यांनी म्हटलंय.
दारू प्राशन केल्यानं करोना विषाणूविरुद्ध सुरक्षा मिळते, असे दावे सोशल मीडियावर केले जात असल्याचं निदर्शनास आल्यानंतर डॉ. तलवार यांनी नागरिकांना ही सूचना केलीय. उल्लेखनीय म्हणजे, पंजाबमध्ये सध्या जवळपास चार लाख जणांना करोना संक्रमणानं गाठलंय.
अशा प्रकारच्या सार्वजनिक चुकीच्या दाव्यांमुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. लोकांनी अधिक प्रमाणात दारु प्राशन केली तर त्यांच्यापर्यंत संक्रमण पोहचण्याचा धोका अधिक आहे. दारुच्या सेवनानं करोना विषाणू मरत नाही, असं डॉ. तलवार यांनी स्पष्ट केलंय.
तसंच कोविड लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर दोन दिवसांपर्यंत नागरिकांनी दारुचं सेवन करू नये, याचीही आठवण त्यांनी यावेळी करून दिली.