Home मनोरंजन करोनामुळे सिनेमाचं भविष्य काय असेल? गिरीश कुलकर्णी म्हणतात…

करोनामुळे सिनेमाचं भविष्य काय असेल? गिरीश कुलकर्णी म्हणतात…

0
करोनामुळे सिनेमाचं भविष्य काय असेल?  गिरीश कुलकर्णी  म्हणतात…

[ad_1]

हायलाइट्स:

  • राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या सोबत खास गप्पा
  • सनफ्लॉवर सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत
  • फिलोसॉफिकल लाइट थ्रिलर वेब सीरि

गौरी भिडे

० लॉकडाउनचा काळ कसा होता?
– स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या लोकांना संघर्षाचा अनुभव नव्हता. यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना जीवनाचं समग्र दर्शन झालं. या काळामुळे कवी, लेखक यांच्याकडून वैविध्यपूर्ण साहित्य मिळू शकलं. पुण्यामध्ये ‘पुणेरी प्लॅटफॉर्म कोविड रिस्पॉन्स’ नावाची एक व्हर्च्युअल संस्था लॉकडाउनच्या काळामध्ये तयार करण्यात आली. त्या संस्थेद्वारे सरकार, इस्पितळ, स्वयंसेवी संस्था, इंडस्ट्री, नागरिक या सगळ्यांना एकत्र घेऊन लॉकडाउनमध्ये येणाऱ्या अनेक समस्यांचं निवारण करण्यात आलं. यामध्ये माझा सहभाग होता. लॉकडाउनच्या काळात केलेल्या या समाजसेवेमुळे मानसिक समाधान आणि आनंद मिळाला.

० ओटीटी (ओव्हर द टॉप) या माध्यमाबद्दल काय वाटतं?
– ओटीटी माध्यमात सेन्सॉरशिप नसल्यानं संवेदनशील आणि चांगल्या लेखकांना व्यक्त होण्यासाठी एक द्वार खुलं झालं. स्वातंत्र्य मिळाल्यानं विविध विषयांवर खूप चांगला आशय तयार आहे. ओटीटीमुळे एक चांगली शिस्तीची कार्यपद्धती तयार झाली आहे. ही मोकळीक मला हवीहवीशी वाटते.

० सिनेमाचं भविष्य काय असेल असं वाटतं? प्रेक्षक सिनेमापासून दुरावतील का?
– मी भविष्याचा फार विचार करणारा माणूस नाही. प्रेक्षक सिनेमाला दुरावतील असं मला वाटत नाही. या करोनाकाळात सिनेमा बघण्यासाठीची माध्यमं निश्चित बदलली आहेत. पण प्रेक्षक अजूनही चित्रपट बघताहेत. जास्तीत जास्त लोकांनी सिनेमा बघावा, त्याचं चांगलं समीक्षण करावं, आस्वाद घ्यावा, प्रतिक्रिया द्याव्यात हीच कलाकाराची अपेक्षा असते. हे सगळं आम्हा कलाकारांपर्यंत आताही पोहोचतंय. या काळात कदाचित निर्मात्यांसाठी व्यवसाय करण्याच्या पद्धती बदलतील.

० ‘सनफ्लॉवर‘ ही वेब सीरिज नेमकी काय आहे? त्यातली भूमिका कशी मिळाली?
– ‘सनफ्लॉवर’ ही एक फिलोसॉफिकल लाइट थ्रिलर वेब सीरिज आहे, असं मी म्हणतो. शहरी वातावरणात एका बिल्डिंगमध्ये घडलेली कथा आहे. आपल्या जगण्याची प्रेरणा काय? या मूळ प्रश्नावर या सीरिजमधून विनोदी अंगानं मार्मिक भाष्य केलं आहे. या सीरिजमधील पोलिस निरीक्षकाच्या भूमिकेसाठी मला पहिल्यांदा विचारलं होतं तेव्हा मी नकार दिला होता. विकास बहलनं स्वत: फोन करून मला सांगितलं की, ‘सर एकदा संहिता तरी वाचा, हा पोलिस वेगळा आहे’. पोलिसाच्या माणूसपणाची बाजू फार कमी वेळा मांडली जाते. तशी काहीशी या संहितेमध्ये आहे.

० तुम्ही या आधीही दोन वेळा पोलिसाची भूमिका साकारली आहे. ‘सनफ्लॉवर’मधल्या पोलिस निरीक्षक तांबे या भूमिकेचं वैशिष्ट्य काय?
– मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूप वेगळी आहे. अतिशय वेगळी आणि सगळ्यांसाठी अनपेक्षित अशी तांबे ही भूमिका आहे. कामामध्ये अतिशय प्रामाणिक असणारा असा हा तांबे आहे.

[ad_2]

Source link