Home मनोरंजन करोनावर लवकर मात करण्यासाठी शिल्पा शेट्टीनं सांगितलं ‘हे’ आसन

करोनावर लवकर मात करण्यासाठी शिल्पा शेट्टीनं सांगितलं ‘हे’ आसन

0
करोनावर लवकर मात करण्यासाठी शिल्पा शेट्टीनं सांगितलं ‘हे’ आसन

[ad_1]

हायलाइट्स:

  • आंतरराष्ट्रीय योगदिवसानिमित्ताने शिल्पा शेट्टीने शेअर केला खास व्हिडीओ
  • करोनातून लवकर बरे होण्यासाठी सांगितले हे आसान
  • प्रत्येकाने नियमीत योग करण्याचे केले आवाहन

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात फिट्ट असलेली अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टीला ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय योगदिवसानिमित्ताने शिल्पाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शिल्पाने करोनातून लवकर बरे होण्यासाठी म्हणून एक आसन सुचवले आहे.

शिल्पाने तिच्या इन्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती भ्रामरी प्राणायाम करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत शिल्पाने लिहिले आहे ‘श्वास… हे सर्वात महत्त्वाची क्रिया असून त्यामुळे शरीराचे कार्य चालते. योग्य पद्धतीने श्वास घेतले तर ते सर्व अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा करतात आणि ते सगळेजण योग्यपद्धतीने काम करतात. पचन, रोगप्रतिकारक शक्ती यामुळे मजबूत होते. तर आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या मुहूर्तावर भ्रामरी प्राणायाम करायला सुरुवात करा…’

या आसनाचे फायदे

भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे काय फायदे होतात, हे देखील शिल्पाने सांगितले आहे. तिने लिहिले आहे, ‘ भ्रामरी प्राणायाम करताना ओम म्हणायचे असते. ओम म्हणत असताना आपल्या शरीरात १५ टक्के जास्त नायट्रिक ऑक्साईड तयार होते. यामुळे करोना आजारातून लवकर बरे होता येते. भ्रामरी प्राणायामामुळे आपल्या श्वासावर काही मिनीटे मन एकाग्र करता येते. त्यामुळे मेंदू शांत होतो, ताण कमी होतो…’

वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ
दरम्यान, शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसबाबत कमालीची सजग आहे. तसेच ती आपल्या चाहत्यांसाठी देखील तिच्या सोशल मीडियावरून सातत्याने व्हिडीओ शेअर करत असते. तिने शेअर केलेले व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडतात. शिल्पाच्या कामाबद्दल सांगायचे तर ती लवकरच ‘निकम्मा’ आणि ‘हंगामा २’ या सिनेमांत ती दिसणार आहे.

[ad_2]

Source link