Home ताज्या बातम्या करोना काळात जुन्या मोबाइल्सची मागणी का वाढली?

करोना काळात जुन्या मोबाइल्सची मागणी का वाढली?

0
करोना काळात जुन्या मोबाइल्सची मागणी का वाढली?

म. टा. प्रतिनिधी मुंबई : करोना संकटात सुरू असलेल्या ऑनलाइन जीवन पद्धतीमुळे वापरलेल्या मोबाइल फोन्सचा (प्री-ओन्ड) बाजार वाढला आहे. मुंबईत अशा प्री-ओन्ड फोन्सचा बाजार जवळपास १३ टक्के आहे. नवीन महागडे फोन सर्वांनाच परवडत नसल्याने वापरलेल्या फोनना मागणी आल्याचे दिसून येतेय.

‘कॅशिफाय’ या वापरलेल्या वस्तूंचा ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या पोर्टलच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्यांपैकी तब्बल ८४ टक्के ग्राहकांनी लॉकडाउनदरम्यान स्मार्टफोन खरेदी केला. त्यामध्ये २३ टक्क्यांसह दिल्ली अग्रस्थानी आहे. तर मुंबई १३ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. ग्राहकांनी त्यांचा जुना मोबाइल फोनची सरासरी ४२१७ रुपयांना विक्री केली. तो स्मार्टफोन सरासरी तीन वर्षे जुना होता. तर ४७ टक्के ग्राहकांनी पुनर्बांधणी केलेला मोबाइल फोन ऑनलाइन खरेदी केला. जुना मोबाइल विक्री करणाऱ्यांपैकी ६२ टक्के स्मार्टफोनची स्क्रीन खराब झाली होती. तर २१ टक्के मोबाइल्सची बॅटरी खराब झालेली होती. सर्वच ब्रँडच्या स्मार्टफोनच्या विक्रीत करोना काळात मोठी वाढ झाली. सरासरी १० हजार ते २० हजार रुपयांदरम्यान किंमती असलेल्या मोबाइल फोनच्या बाजारात सर्वाधिक वाढ दिसून आली, असे सर्वेक्षणात समोर आले.

Source link