Home बातम्या आंतरराष्ट्रीय करोना रुग्णांच्या उपचारासाठी आता ‘अँटीबॉडी कॉकटेल’ला मंजुरी; अमेरिका, युरोपात आधीच वापर सुरू

करोना रुग्णांच्या उपचारासाठी आता ‘अँटीबॉडी कॉकटेल’ला मंजुरी; अमेरिका, युरोपात आधीच वापर सुरू

0
करोना रुग्णांच्या उपचारासाठी आता ‘अँटीबॉडी कॉकटेल’ला मंजुरी; अमेरिका, युरोपात आधीच वापर सुरू

[ad_1]

नवी दिल्लीः देशात करोनावरील रुग्णांच्या उपचारासाठी ‘अँटीबॉडी कॉकटेल’च्या आपत्कालीन ( roche antibody cocktail ) वापराला सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशनने (CDSCO) मंजुरी दिली आहे. या औषधाचे उत्पादन करणाऱ्या रॉश इंडिया ही माहिती दिली.

कासिरिव्हिम्ब आणि इमदेवमब अँटीबॉडी मिश्रणाच्या उपयोगाबाबत अमेरिकेतील ईयूएने जमा केलेली आकडेवारी आणि युरोपीय संघाच्या मानवी चिकित्सा उत्पादन वापरासंबंधी समितीच्या ( सीएचएमपी) शास्त्रज्ञांनी दिलेल्या सल्ल्याच्या आधारावर भारतात या अँटीबॉडी कॉकटेलला मंजुरी मिळाली आहे, रॉश इंडियाने ही माहिती दिली.

आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाल्याने रॉश जगातील उत्पादकांकडून आयात करून भारतात रणनितीक भागिदार असलेल्या सिपलाच्या माध्यामातून ते वितरीत करेल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं.

महाराष्ट्रातील करोनाच्या व्हेरियंटने तेलंगण, आंध्रात थैमान

अँटीबॉडी कॉकटेलचा उपयोग करोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी केला जातो. या औषधाचा उपयोग हा अमेरिका आणि युरोपमध्ये केला जातोय. हॉस्पिटलमध्ये दाखल नसलेल्या रुग्णांसाठी या औषधाचा उपयोग होतोय. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपचारात याच औषधाचा उपयोग करण्यात करण्यात आला होता.

लखनऊतील ऑक्सिजन प्लांटमध्ये भीषण स्फोट, ३ ठार तर ७ जखमी

coronavirus : सावधान! देशात करोनाची तिसरी लाट येणार, शास्त्रज्ञांनी दिला इशारा

[ad_2]

Source link