हायलाइट्स:
- जानेवारी ते मार्च या तिमाहीत १४० टन सोन्याची विक्री झाली आहे.
- सोने विक्रीचे एकूण मूल्य पाहता जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत ५८८०० कोटीचे सोनं विक्री झाले.
- सोन्याची बिस्किटे आणि नाण्यांची मागणी वाढल्याने ईटीएफच्या मागणीत घट
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गोल्ड डिमांड ट्रेंड्स अहवालानुसार जानेवारी ते मार्च या काळात देशात १०२ टन दागिन्यांची विक्री झाली. तर गेल्या वर्षी याच काळात ७३.९ टन दागिन्यांची विक्री झाली होती.
निर्यातीची मोठी झेप ; एप्रिल महिन्यात भारतने केली ३० अब्ज डॉलर्सची निर्यात
जागतिक बाजाराचा विचार केला तर पहिल्या तिमाहीत सोन्याची एकूण मागणी ८१५.७ टन होती. त्याआधीच्या तिमाहीतही जवळपास इतकीच मागणी होती. मात्र, सोनेआधारित ईटीएफचा आऊटफ्लो १७७.९ टन झाल्याने मागील वर्षीच्या या काळाच्या तुलनेत मागणीत लक्षणीय (२३ टक्के) घट झाली. याच तिमाहीत सोन्यातील गुंतवणुकीची मागणी घटली आहे.
करोनाचा कहर ; सोने-चांदी तेजीत , जाणून घ्या किती रुपयांनी महागले सोने
सोन्याची बिस्किटे आणि नाण्यांची मागणी वाढल्याने ईटीएफच्या मागणीतील घटीचा हा परिणाम कमी झाला. अशा रीटेल स्वरुपातील सोन्याची खरेदी ३३९.५ टनांवर पोहोचली (मागील वर्षीच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी अधिक). किमतींच्या आधारे तोलून-मापूनन ‘बार्गेन करणे’ आणि वाढत्या महागाईची चिंता ही यामागील मुख्य कारणे होती.
लशींचा तुडवडा ; ‘सीरम’च्या आदर पुनावाला यांना धमक्यांचे फोन, बड्या नेत्यांचे दबावतंत्र
कोव्हिड पश्चात काळात पुन्हा एकदा खरेदीचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांनी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली. यामुळे खरेदी केलेल्या सोन्याचे मूल्य वार्षिक ५२ टक्के वाढ होऊन ४७७.४ टनांवर पोहोचले. २०२० च्या पहिल्या तिमाहीतील अत्यंत कमकुवत आठवड्याच्या तुलनेत ही फारच चांगली सुधारणा होती. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या किमतीत विक्रमी उच्चांक गाठला गेला होता. त्यानंतर किमती घटल्याने ग्राहकांच्या मागणीत वाढ झाली. पहिल्या तिमाहीपासून सोन्याच्या किमतीत १० टक्के वाढ झाली. शिवाय, जागतिक अर्थकारणात सुधारणा झाल्याने सोन्याच्या मागणीला पुन्हा एकदा चालना मिळाली.
बंगालमध्ये भाजपची हार ;सेन्सेक्स-निफ्टी गडगडले, एक लाख कोटींचा चुराडा
जगभरातील देश आता पूर्वपदावर येत आहे, अर्थव्यवस्था सावधरित्या पूर्ववत होत आहेत. यामुळे पहिल्या तिमाहीत ग्राहकांचा विश्वास पुन्हा स्थापन होण्यास प्रोत्साहन मिळाले. सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत झालेल्या लक्षणीय वाढीतून हे अधोरेखित झाले असल्याचे मत वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे सीनिअर मार्केट्स अॅनालिस्ट लुईस स्ट्रीट यांनी व्यक्त केले.
दुसऱ्या बाजूला कोव्हिड-१९च्या सुरुवातीच्या काळातील परिणामातून सावरण्यासाठी गुंतवणूकदारांनी सोन्याचा मार्ग निवडल्याने २०२१ च्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था सुधारतील हा विश्वास वाढीस लागल्याने आणि अमेरिकेतील व्याजदरांत प्रचंड वाढ झाल्याने सोन्याच्या किमतीही वाढ झाली.