कर्जतमधील व्यक्तीकडून शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

कर्जतमधील व्यक्तीकडून शिल्पा शेट्टीच्या आईची  फसवणूक, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
- Advertisement -


मुंबई: नवोदित अभिनेत्रींचे अश्लील चित्रकरण करून हे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला अटक करण्यात आली आहे. असं असतानाच शिल्पाच्या आईनं पोलिस ठाण्यात फसवणुक झाल्याच्या तक्रार दाखल केली आहे. शिल्पाची आई सुनंदा शेट्टी यांनी भूखंड व्यवहार प्रकरणात फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे.

सुनंदा शेट्टी यांनी रायगड जिल्ह्यात कर्जत इथं भूखंड खरेदी केला होता. भूखंड व्यवहार प्रकरणी सुधाकर घारे नावाच्या व्यक्तीनं त्यांची फसवणूक केल्याचं त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
सुनंदा शेट्टी यांन दिलेल्या माहितीनुसार त्यांनी २०१९ मध्ये कर्जत इथं जमीन खरेदी करण्यासंदर्भात संपर्क केला. त्यानंतर त्यानं ही जमीन त्याची असल्याचं सांगत २०२०मध्ये सुनंदा यांना विकली होती. परंतु चौकशी केल्यानंतर ही जमीन त्याची नसल्याचं समोर आलं. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं सुनंदा यांना लक्षात आलं. सुनंदा यांनी त्या व्यक्तीला पैसै परत करण्यास सांगितलं. परंतु त्यानं साफ नकार देत त्याची बड्या नेत्याची ओळख असल्याचं सांगितलं. त्यामुळं सुनंदा यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाच्या आदेशांनंतर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.



Source link

- Advertisement -