Home बातम्या राजकारण कर्नाटकात काँग्रेसला धक्का; दोन आमदारांचा राजीनाम्याने हालचालींना वेग

कर्नाटकात काँग्रेसला धक्का; दोन आमदारांचा राजीनाम्याने हालचालींना वेग

बंगळुरू : आनंद सिंह आणि रमेश जारकिहोली या दोन काँग्रेस आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 78 जागा जिंकल्या होत्या.

आनंद सिंह आणि रमेश जारकिहोली हे पक्षावर नाराज असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं कळतंय.

काँग्रेसचे सहा आमदार राजीनामा देणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस- जेडीएसचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे, असं बोललं जातंय.

दरम्यान, भाजप दिवसाढवळ्या कर्नाटकाचे सरकार अस्थिर करण्याचं स्वप्न पाहत आहे, अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केली आहे.