Home शहरे अकोला कर्मचारी संघटनेकडून मंत्रालयात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’

कर्मचारी संघटनेकडून मंत्रालयात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’

0
कर्मचारी संघटनेकडून मंत्रालयात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’

मुंबई दि, 12:  अनुसूचित जाती / जमाती / विजा – भज / इमाव/ विमाप्र, शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई या संघटनेच्या वतीने आज मंत्रालयात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ घरोघरी तिरंगा उपक्रम साजरा करण्यात आला. सर्वांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले.

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांनी तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव सुभाष गावडे यांनी पुष्प अर्पण केले. ‘वंदे मातरम’ ‘भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो’ या  घोषणा देण्यात आल्या.

कार्यक्रमास मुख्य अभियंता तथा सहसचिव दिलीप प्रक्षाळे, अवर सचिव सर्वश्री अंबादास चंदनशिवे, राजेश बागडे, विकास थोरात, प्रकाश पाटील, अवर सचिव तथा कार्यकारी अभियंता बाळासाहेब भवर, कक्ष अधिकारी रवि व्हटकर, प्रवीण कोतमे, शरद खारोडे, दत्तात्रय शिंदे, प्रतिभा चौधरी, वसुधा जाधव, आनंद वरकडे, कविता पिसे, स्मिता खानोलकर, निवेदिता वारुळे, सिध्देश्वर कंजारे, मल्लिकार्जुन पनशेट्टी, निधी सावंत तसेच ग्राम विकास विभागाचे उपसचिव मनोज जाधव, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव राजेंद्र सवणे, कार्याध्यक्ष सुभाष गवई, उपाध्यक्ष भास्कर बनसोडे, कोषाध्यक्ष सी. आर. निखारे, उपाध्यक्ष विजय नांदेकर, राजू निखारे, राजीव देवकते, प्रविण पवार, किरण शार्दुल व इतर पदाधिकारी, मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

000

उपसंपादक/श्री. नारायणकर