Home गुन्हा कलयुग ! जन्मदात्या आई-वडिलांना बेदम मारहाण

कलयुग ! जन्मदात्या आई-वडिलांना बेदम मारहाण

पिंपरी :वृद्ध आई-वडिलांना मारहाण करणा-या मुलाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. १) दुपारी एकच्या सुमारास जयभीमनगर, दापोडी येथे घडला आहे.

विकी रामचंद्र मारी (३८, रा. जयभीमनगर, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकणी सगाई रामचंद्र मारी (६५) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सगाई आणि त्यांचे पती रामचंद्र ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना वयोमानानुसार शरीराची हालचाल करता येत नाही. त्यांचा सांभाळ विकी करीत नाही. तसेच तो वारंवार आई-वडिलांना त्रास देतो, मारहाण करतो. सोमवारी दुपारी त्याने बहिणीच्या घरात घुसून बहिणीला मारहाण केली.

तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. बहिणीच्या घराच्या दरवाजावर कोयत्याने मारून तो तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरात दहशत पसरवली. याबाबत सगाई यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.