Home ताज्या बातम्या कल्याण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटनेता पदावरून गटबाजी, महापौरांना पत्र

कल्याण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटनेता पदावरून गटबाजी, महापौरांना पत्र

0

कल्याण : कल्याण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटनेता पदावरून सूरु असलेली गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका महासभेत राष्ट्रवादी नगरसेवक संतोष तरे यांची गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली. या आधी नगरसेविका शाहीन डॉन या गटनेता पदी होत्या. कल्याण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी संतोष तरे यांची गटनेते पदी नियुक्ती करावी असे पत्र महापौर विनिता राणे यांना दिले होते. मात्र, संतोष तरे यांच्या नियुक्ती नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एक पत्र महापौर यांना पाठवले आहे. ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की, संतोष तरे यांचे नियुक्ती पत्र प्रदेश कार्यालयाने दिलेल नसल्याने संतोष तरे यांच्या पदाला स्थगिती द्यावी.

मात्र. याबाबत जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, राष्ट्रवादीच्या माजी गटनेत्या शाहीन डॉन यांचे पती जव्वाद डॉन आणि संतोष तरे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, या तिन्ही लोकांनी मुंबईत असल्याचे सांगितले. या प्रकरणी पालिका सभागृह नेते प्रकाश पेणकर यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत राष्ट्रवादी प्रदेशकडून पिठाशीन अधिकाऱ्यांना त्यांच्या नावाने पत्र येत नाही, तो पर्यंत रमेश हनुमंते यांचे पत्र ग्राह् धरले जाणार आहे.