Home ताज्या बातम्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे निधन

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे निधन

दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि सर्वाधिक काळ दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या शीला दीक्षित यांचे आज (शनिवार) दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. दिल्लीतील एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सध्या त्यांच्याकडे दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी होती.

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी असलेल्या शीला दीक्षित यांनी १९९८ ते २०१३ अशी सलग १५ वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज सकाळी हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांना एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांनी अखेटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने काँग्रेसला मोठाच झटका बसला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेसह ज्येष्ठ नेत्यांनी दीक्षित यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.