काँग्रेसला धक्का, धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडेंसह डझनभर नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरुच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मंगळवारी धाराशिव जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष प्रशांत चेडे यांच्यासह डझनभर नेत्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मंत्री तानाजी सावंतही उपस्थित होते.

प्रशांत चेडे यांच्यासह काँग्रेसच्या 3 तालुकाध्यक्ष आणि डझनभर जिल्हा परिषद सदस्यांनी सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे राजीनामे दिले होते. मंगळवारी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. धाराशिव जिल्ह्याचा सेनापतीच शिवसेनेत आल्याने भूम परंडा आणि वाशी तालुक्यात काँग्रेसचा गड ढासळला आहे.

- Advertisement -