Home बातम्या राजकारण काँग्रेस नेते कोमात; इच्छुक उमेदवार जोमात

काँग्रेस नेते कोमात; इच्छुक उमेदवार जोमात

मुंबई : लोकसभा निवडणुकीत गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत काँग्रेसला आलेल्या अपयशामुळे आणि राहुल गांधींनी दिलेल्या राजीनाम्याच्या मुद्यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये मोठ्याप्रमाणात नैराश्य पहायला मिळत आहे. तर अनेकांनी पराभवाची नैतिक जवाबदारी स्वीकारून राजीनामे सुद्धा दिले आहेत. मात्र असे असतानाही विधानसभा निवडणूकासाठी इच्छुक असलेले उमेदवार मात्र आपल्या मतदारसंघात कामाला लगले आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते कोमात, इच्छुक उमेदवार जोमात असे म्हणण्याची वेळ आली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अवघ्या ५२ जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे पराभवाची जवाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला .  राजीनामा परत घ्यावा यासाठी काँग्रेसमधील जेष्ठ नेत्यांनी राहुल यांना साकड घातलं. मात्र राहुल आपल्या निर्णयावर ठाम असल्याने, काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यातील विधानसभानिवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना सुद्धा नेत्यांमध्ये राजीनामा सत्र सुरूच असून, पुढे काय ? यावर नेतेमंडळी अडकून बसले आहेत. तर दुसरीकडे मात्र विधानसभेसाठी काँग्रेसच्या इच्छुकांनी पक्षाचे निर्णय होईल तेव्हा होईल, पण त्याआधीच आपला मतदारसंघ पिंजून काढणे सुरु केले आहेत.

वंचित सोबत आघाडी बाबतचा निर्णय वरून काँग्रेसनेते संभ्रमात आहेत. त्यातच काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये आलेली नैराश्य यामुळे पक्षाचे महत्वाचे नेते चिंतेत आहेत. विधनासभा मतदारसंघात मात्र स्वतःला भावी आमदार म्हणणारे काँग्रेसनेते कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी सोशल मिडियावर आपणच उमेदवार असणार असल्याचे प्रचार सुद्धा सुरु केला आहे. तर काही ठिकाणी  आंदोलन करून लोकांना जवळ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवार जोमात असल्याचे पहायला मिळत आहे.

अनिल पटेल औरंगाबाद जिल्हाध्यक्ष काँग्रेस )

लोकसभेचा निकाल काय आला हे आता सगळ्यांनाच  माहित आहे. परंतु विधानसभेचा विचार केला तर, कार्यकर्त्यांमध्ये आणि इच्छुक उमदेवार यांच्यात कुठेच नैराश्या जाणवत नाही. अनेक ठिकाणी निदर्शने आणि धरणे झालीत त्यात मोठ्याप्रमाणात कार्यकर्त्यांचा सहभाग पहायला मिळाला. इच्छुकांनी सुद्धा जोरात काम सुरु केले आहेत.